"हे मस्तावलेलं सरकार आहे, निवडणुकांचे निकाल आधीच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणुका कशाला लढवत आहात, निवृत्त व्हा. हे सरकार मस्तावलेलं बेलगाम घोडं आहे, त्याचा लगाम पकडण्याची गरज आहे. त्याला वठणीवर आणणार", अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
"निवडणूका आल्या की देसाला धोका कसा निर्माण होतो आणि निवडणूका संपल्या की सर्वत्र शांतता कशी असते" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पिंपरी चिंचवड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. "अर्थमंत्री सीतारामन यांचे पती पत्नीला म्हणतात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बसावं आणि अर्थव्यवस्थेतील धडे घ्यावेत. अजून पाच नॅशनलाइज बँक डुबणार आहेत. त्या डूबण्यापासून वाचवणे आपल्या हातात आहे". अशी माहितीही त्यांनी दिली.