महिलांशी कसं वागावं, हे पुरुषांना शिकवावं लागेल- सरसंघचालक

सोमवार, 2 डिसेंबर 2019 (13:49 IST)
महिलांशी कसं वर्तन करावं, हे पुरुषांना शिकवावं लागेल, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.  
 
"महिला सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. मात्र सगळं काही सरकारवर सोडता येणार नाही. त्यामुळे स्त्रीच्या सन्मानाची शिकवण घरापासून सुरु करायला हवी," असं भागवत यांनी म्हटलं.
 
दिल्लीतील लाल किल्ल्यात आयोजित 'गीता प्रेरणा महोत्सव 2019' या कार्यक्रमात ते बोलत होते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : बच्चू कडू