Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन गडकरी: स्कॅनिया कंपनीला कंत्राट देण्यासाठी लाचखोरी केल्याचा आरोप गडकरींनी फेटाळला

नितीन गडकरी: स्कॅनिया कंपनीला कंत्राट देण्यासाठी लाचखोरी केल्याचा आरोप गडकरींनी फेटाळला
, गुरूवार, 11 मार्च 2021 (16:15 IST)
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कंपनीला कंत्राट देण्याच्या बदल्यात बसच्या स्वरूपात लाच घेतली होती असा आरोप स्वीडिश न्यूज चॅनल एसव्हीटीने केला आहे. नितीन गडकरींनी हे आरोप फेटाळले आहेत.
 
स्वीडिश न्यूज चॅनल एसव्हीटी आणि काही मीडिया कंपन्यांनी स्वीडनची ट्रक आणि बस निर्माण करणारी कंपनी 'स्कॅनिया' ने भारतातील सात राज्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी, 2013 ते 2016 मध्ये लाच दिली होती, असा आरोप केला.
कंत्राट देण्याच्या बदल्यात स्कॅनिया कंपनीने नितीन गडकरी यांच्या मुलाशी संबंधित कंपनीला बस लाचच्या स्वरूपात दिली होती.
गडकरी यांच्या कार्यालयाने हे आरोप फेटाळताना म्हटले आहे की "हे आरोप निराधार, बनावट आणि द्वेषयुक्त आहेत."
काय आहे प्रकरण?
 
ट्रक आणि बस निर्मिती करणाऱ्या 'स्कॅनिया'ने कॉन्ट्रॅट मिळवण्यासाठी लाच दिल्या प्रकरणी चौकशी अहवालाची माहिती दिली.
एसव्हीटीच्या रिपोर्टनंतर स्कॅनियाच्या अधिकाऱ्यांकडून गैरवर्तणूक झाल्याचे स्कॅनिया कंपनीने मान्य केल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. जे लोक या गैरव्यवहारात होते ते कंपनी सोडून गेल्याचं देखील स्कॅनियाने म्हटलं आहे.
 
नितीन गडकरींवर आरोप काय?
एसव्हीटीने आपल्या वृत्तात लिहिले आहे की "स्कॅनियाने एक खास बस, नितीन गडकरी यांच्या मुलाशी संबंधित एक कंपनीला दिली. ही बस वापरण्याचा हेतू, गडकरी यांच्या मुलीच्या लग्नासाठी होता. याचे पूर्ण पैसे देण्यात आले नाहीत."
 
गडकरींनी फेटाळले आरोप
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गडकरी यांच्या कार्यालयाने आरोपांचं खंडन करण्यासाठी एक पत्रक जारी केलं
• नोव्हेंबर 2016 मध्ये स्कॅनियाने, एक लक्झरी बस नितीन गडकरी यांच्या मुलाशी अंत्यंत जवळचे संबंध असलेल्या कंपनीला दिली, हा आरोप निराधार, बनावट आणि द्वेषयुक्त आहे.
 
• या बससाठी पूर्ण पैसे देण्यात आले नाहीत. ही बस गडकरी यांच्या मुलीच्या लग्नासाठी वापरण्यात आली. हे आरोप कल्पित आणि मीडियाची कल्पना आहेत
 
• मंत्री आणि कुटुंबीयांचा बस खरेदी किंवा विक्रीशी काही संबंध नाही
 
• ही बस विकत घेणारी किंवा विकणारी कंपनी, किंवा व्यक्ती यांच्याशी गडकरी कुटुंबाचा काही संबंध नाही
 
• हे प्रकरण स्वीडनच्या कंपनीचं अंतर्गत प्रकरण आहे
 
• त्यामुळे मीडियाने कंपनीची अधिकृत भूमिका समोर येईपर्यंत वाट पाहावी
 
गडकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग नसल्याचा कंपनीकडून खुलासा
कंपनीने नितीन गडकरी यांना वापरासाठी कोणती बस दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केलाय.
 
स्कॅनियाचे प्रवक्ते हान्सेक डॅनिल्सन म्हणतात, "ही बस 2016 मध्ये कंपनीच्या एका डिलरने विकत घेतली होती. त्यांनी ही बस त्यांच्या एका ग्राहकाला दिली. मला या बसच्या सद्यस्थितीबद्दल काही माहिती नाही."
 
नितीन गडकरींच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देताना सांगितलंय "भारतात ग्रीन पब्लिक ट्रान्सपोर्ट आणण्याच्या योजनेअंतर्गत नितीन गडकरी यांनी स्कॅनियाची इथेनॉलवर चालणारी बस नागपूरमध्ये आणली होती."
नागपूर महानगरपालिकेला गडकरी यांनी हे पायलट प्रोजेक्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यानंतर नागपूर महापालिकेने स्वीडिश कंपनीसोबत सामंजस्य करार केला होता.
 
मोदी गडकरींची चौकशी करणार का? पृथ्वीराज चव्हाण
"नितीन गडकरी यांच्यावर स्वीडीश टिव्ही SVT, ने केलेले आरोप गंभीर आहेत," असं ट्वीट कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.
"आरोपाप्रमाणे, बस निर्मिती करणारी कंपनी स्कॅनियाने, एक लक्झरी बस त्यांना, भारतात कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या उद्देशाने दिली. स्कॅनियाने गैरवर्तन मान्य केलंय. नरेंद्र मोदी या प्रकरणी चौकशी करणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
 
स्कॅनिया घोटाळ्याप्रकरणी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचं नाव घेण्यात आल्याचं त्यांनी पुढे म्हटलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

14 मार्चला नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली