Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रजनीकांत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या चित्रिकरणा दरम्यान खरंच जखमी की स्टंट?

webdunia
, बुधवार, 29 जानेवारी 2020 (11:47 IST)
डिस्कव्हरी वाहिनीसाठी 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमाचं चित्रीकरण करताना सुपरस्टार रजनीकांत जखमी झाले आहेत. या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रिल्ससोबत म्हैसूरजवळच्या बांदीपूर अभयारण्यामध्ये चित्रीकरण करत असताना रजनीकांत किरकोळ जखमी झाले.
 
यापूर्वी गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही बेअर ग्रिल्ससोबत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
आपल्याला फारशी दुखापत झाली नसल्याचं रजनीकांत यांनी म्हटल्याचं ANI वृत्तसंस्थेने दिलंय. "मी 'मॅन व्हर्सेस वर्ल्ड'चं शूटिंग संपवलं आहे. मला जखम झालेली नाही. फक्त काट्यांमुळे ओरखडे आले आहेत. मी व्यवस्थित आहे," रजनीकांत यांनी चित्रीकरणानंतर चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
तर रजनीकांत यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसून ते व्यवस्थित असल्याचं बांदीपूर टायगर रिझर्व्हचे संचालक टी. भालचंद्र यांनी म्हटल्याचं वृत्त न्यूज 18ने दिलंय.
 
एपिसोड चित्रीत करत असताना रजनीकांत पडल्याच्या वृत्ताविषयी भालचंद्र यांनी म्हटलंय, "ते सगळं खोटं आहे. एका शॉटसाठी रजनीकांत यांना घसरायचं होतं, त्याप्रमाणे ते पडले आणि सगळेजण धावले. हा सगळा स्क्रीनप्लेचा भाग होता."
 
IANS शी बोलताना भालचंद्र यांनी हे सांगितल्याचं न्यूज 18ने म्हटलंय. या शॉटनंतर रजनीकांत उठले, त्यांनी शूट पूर्ण केलं आणि चेन्नईला परतल्याचंही भालचंद्र यांनी सांगितलं.
 
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा मॅन व्हर्सेस वाईल्डचा भाग ऑगस्ट 2019मध्ये प्रसारित करण्यात आला होता. फेब्रुवारी 2019मध्ये याचं चित्रीकरण उत्तराखंडमधल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये करण्यात आलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वसंत पंचमी हा भारतीय व्हॅलेंटाईन डे आहे का?