Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 March 2025
webdunia

शब-ए-बारात : कोरोना व्हायरस संकटात मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन

, मंगळवार, 7 एप्रिल 2020 (15:38 IST)
8 एप्रिलला मुस्लिमांचा शब-ए-बारात हा सण येतोय. अल्लाहची माफी मागण्याचा आणि आपल्या पितरांसाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस आहे.
 
मात्र यंदा कोव्हिड-19च्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन, लोकांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जमू नये, असं आवाहन वेगवेगळ्या स्तरांतून केलं जात आहे.
 
शब-ए-बारात म्हणजे नेमकं काय?
 
इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे आठवा महिना म्हणजे शबान. या महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवसादरम्यानची रात्र ही शब-ए-बारात म्हणून साजरी केली जाते. दक्षिण आशियात याला विशेष महत्त्व आहे.
 
या रात्री मुस्लीम धर्मीय कब्रस्तानात जाऊन आपल्या पितरांसाठी प्रार्थना करतात ,त्यांच्या कबरींवर फुलं वाहतात. यानंतर ते अल्लाहची प्रार्थना करतात.
 
यंदा 8 किंवा 9 एप्रिल या दिवशी शब-ए-बारात येईल. चंद्रदर्शनावर हे अवलंबून आहे.
 
'शब-ए-बारात घरातच साजरी करा'
मात्र हे रीतीरिवाज पार पाडायला मुस्लिमांना घराबाहेर पडावं लागेल, आणि कब्रस्तानात गर्दी होण्याचीही शक्यता असतेच. त्यामुळे शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लीम धर्मीयांनी कब्रस्तानात न जाता घरातच राहावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
 
दिल्लीतल्या निझामुद्दीन परिसरात तबलिगी जमातच्या शिबिराची जी घटना घडली तशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यायला हवी असंही पवार म्हणाले.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुस्लीम धर्मियांना कब्रस्तानात तसंच मशिदींमध्ये न जमता घरातच हा सण साजरा करण्याचं आवाहन केलंय.
webdunia
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणांमध्ये वेळोवेळी लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलंय. कोणत्याही धार्मिक सणासाठी गर्दी करू नका, असं आवाहन त्यांनीही केलंय.

शब ए बारातच्या दिवशी धर्मस्थळांमध्ये किंवा कब्रस्तानांमध्ये लोक जमणार नाहीत याची खातरजमा करण्याच्या सूचना उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाने राज्यातील सर्व कब्रस्तानांच्या तसंच धर्मस्थळांच्या ट्रस्टींना आणि व्यवस्थापन समित्यांना दिल्या आहेत. लोकांना घरातच प्रार्थना करण्याचं आवाहन करावं अशीही सूचना करण्यात आली आहे.
 
लखनौमधील इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने भारतातल्या तमाम मुस्लीम समाजाला शब-ए-बारातच्या दिवशी घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. लखनौच्या सर्वांत मोठ्या इदगाहचे मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनी शब-ए-बारातच्या निमित्ताने होणारा जलसा रद्द करण्यात आल्याचं सांगतानाच लोकांनी कब्रस्तानात जमा न होता आपापल्या घरीच राहण्याचं आवाहन केलंय.
 
कोरोना व्हायरसच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी लोकांनी घरात राहाणं गरजेचं आहे. सुरुवातीला केलेल्या आवाहनांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने आणि परिस्थिती आणखी गंभीर झाल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला.
 
याच लॉकडाऊनच्या काळात रामनवमी आणि गुढीपाडवा हे हिंदू सणही येऊन गेले. आता शब-ए-बारात येऊ घातलाय आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी आंबेडकर जयंती असणार आहे.ॉ
 
सणांच्या निमित्ताने लोकांनी एकत्र येऊन रोगप्रसाराची शक्यता वाढू नये, यासाठी विविध शासकीय तसंच प्रशासकीय यंत्रणांद्वारे आवाहन केलं जातंय.
 
दिल्ली पोलिसांनी सर्व दिल्ली वासियांना शब-ए-बारातच्या दिवशी कब्रस्तानात न जाता घरातच ती साजरी करण्याचं आवाहन केलंय.
 
नवी मुंबई पोलिसांनी लोकांना येणाऱ्या काही दिवसांतले सर्व सण आपल्या घराच्या चार भींतीमध्ये साजरे करण्याचं आवाहन केलं होतं.
 
शब-ए-बारातची वेगवेगळी नावं
शब-ए-बारात ही रात्र वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. भारतीय उपखंडात हिला शब-ए-बारात म्हणून ओळखलं जातं, तर अरेबिकमध्ये लैलातुल बारात, इंडोनेशिया तसंच मलेशियामध्ये निस्फू शबान किंवा मलम निस्फू स्यबान या नावाने तर टर्कीमध्ये बेरात कंदिली या नावाने ही रात्र ओळखली जाते.
 
या दिवशी मिठाई वाटणं, रोषणाई करणं, एकमेकांच्या भेटी घेणं यांसारख्या गोष्टी केल्या जातात. शब-ए-बारातनंतर 15 दिवसांनी रमजानचा महिना सुरू होतो जो इस्लाममधील सर्वांत पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या महिन्यात मुस्लीम धर्मीय उपवास ठेवतात. रमजानची सांगता रमजान ईदने होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील काही भाग होणार सील