रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना पावसानं व्यत्यय आणल्यानं खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजनं 15.3 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 98 धावा केल्या होत्या.
पावसानं विश्रांती न घेतल्यानं अखेर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. फलंदाजीसह गोलंदाजीतही चुणूक दाखवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.