Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

व्हॉट्सअॅप अपडेट करा: भारतीय सायबर एजन्सीने दिला इशारा कारण...

Update WhatsApp: Indian Cyber Agency Warns Reason ...
, गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (14:13 IST)
तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करा, असा तातडीचा सल्ला सर्ट या भारताच्या प्रमुख सायबर सेक्युरिटी एजन्सीने देशभरातील युजर्सना दिला आहे.
 
व्हॉट्सअॅपच्या जुन्या व्हर्जनमध्ये एक धोकादायक व्हायरस शिरकाव करण्याची शक्यता असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हीडिओ फाईलमुळे व्हॉट्सअॅप तसंच फोनला धोका असल्याने काळजी घ्या, असं आवाहन सर्टने केलं आहे.
 
युजर्सच्या फोनला प्रॉब्लेम होत असल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवण्यासारखं काही घडलेलं नाही, असं व्हॉट्सअपने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपचा वापर स्पायवेअर इन्स्टॉल करण्यासाठी झाल्याची कबुली व्हॉट्सअॅपने दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे.
 
व्हॉट्सअॅपची मालकी फेसबुककडे आहे. व्हॉट्सअॅप अॅप्लीकेशनवर सायबर हल्ला होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्याकरिता तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, असं फेसबुकने स्पष्ट केलं.
 
सर्ट एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या युजरने व्हॉट्सअॅपवरद्वारे अनोळखी व्यक्तीकडून आलेला व्हीडिओ ओपन केला तर पेगासिस मालवेअर सारखी व्यवस्था कार्यान्वित होईल.
 
पेगासिस हा इस्रायली मालवेअर लोकांच्या फोन्समध्ये व्हॉट्सअॅपद्वारे शिरून त्यांच्या संवादावर पाळत ठेवतो, असा कबुली व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्याद्वारे भारतासह काही देशांमधली सरकारं काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन तसंच संभाषण टॅप करत असल्याचं वृत्त होतं. युजर भौगौलिकदृष्ट्या कुठेही असेल तर त्याने कॉल करून केलेलं संभाषण, व्हॉट्सअॅप संभाषण हे टॅप केलं जाऊ शकतं.
 
व्हॉट्सअॅपद्वारे आलेला व्हीडिओ ओपन करून पाहण्याकरता युझरची परवानगी आवश्यक होती. पेगासिस मालवेअरमध्ये व्हॉट्सअॅपच्या व्हीडिओ कॉलिंगमधील तांत्रिक गोष्टींचा गैरफायदा करून घेत थेट कार्यान्वित होतं.
 
व्हॉट्सअॅप व्हर्जन अपडेट करण्यासंदर्भात सेक्युरिटी अपडेटकडे युजर्सनी लक्ष द्यावं, असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी युजर्स असून, कंपनीकरता ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट