Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीव- दमणचे रमणीय सुमद्रकिनारे

दीव- दमणचे रमणीय सुमद्रकिनारे
, सोमवार, 18 जानेवारी 2021 (08:12 IST)
गुजरात व महाराष्ट्र नजीक असल्याने या पर्यटनस्थळांना अधिक चालना मिळाली आहे. दमण आणि दीववर पोर्तुगिजांचे साम्राज्य होते. यानंतर स्वातंत्र्य मिळवून गोव्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. 1987 मध्ये हा प्रदेश केंद्रशासित करण्यात आला. 
 
दमण आणि दीवची पार्श्वभूमी - 
भारतातील प्रमुख व्यावसायिक केंद्र मुंबईहून दमण 193 कि. मी. आहे. याच्या उत्तरेला 'कोलाक' तर दक्षिणेला 'कलाई' नदी आहे. दमणच्या नजीक गुजराथचा वलसाड हा जिल्हा आहे. दीव हा द्वीप दोन पुलांनी जोडण्यात आला आहे. गुजराथच्या जुनागढ जिह्याशी जोडला गेला आहे. 
 
दमणमध्ये पाहण्यासारखे - 
'मोटी दमण' आणि 'नानी दमन' या दोन भागांमध्ये याचे विभाजन करण्यात आले आहे. दमनगंगा नदीने हे विभाजन केले आहे. मोटी दमणमध्ये अनेक जुने चर्च आहेत. यामध्ये 'कॅथेडरल बोल जेसू' हे मोठे चर्च आहे. 
 
या चर्चच्या दारांवर ईसा मसीहच्या जीवनावर करण्यात आलेली सुंदर चित्रकारी तसेच लाकडावर करण्यात आलेले नक्षीकाम पर्यटकांना आकर्षित करते. नानी दमणमधील संत जॅरोम हा किल्ला प्रमुख आकर्षण आहे. 
 
याशिवाय बोम जीजस चर्च, अवर लेडी ऑफ सी चर्च, अवर लेडी ऑफ रेमीडियोज चर्च, परगोला गार्डन, अम्यूजमेंट पार्क, दमनगंगा टूरिस्ट कॉम्प्लेक्स, काचीगाम, सत्य सागर उद्यान, मिरासोल गार्डन, मिरासोल वाटर पार्क पाहण्यासारखी स्थळे याठिकाणी आहेत. 
 
दमणमधील बीच - 
अरबी समुद्राने दमणला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. याठिकाणी देविका आणि जॅमपोरे हे दोन बीच आहेत. 
 
देविका बीच - हा बीच दमणपासून पाच कि. मी अंतरावर आहे. येथे मोठे बार, रेस्टॉरंट आहेत. याठिकाणी पार्क व इतर खेळणी असल्याने हा बीच लहान मुलांना आकर्षित करतो. 
 
जॅमपोरे बीच - नानी दमणमध्ये असणारा हा बीच प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. याठिकाणी पर्यटकांची संख्या अधिक असते. येथील शांतता पर्यटकांना खेचून आणते. याचकारणामुळे प्रेमी युगुले येथे स्वच्छंदपणे फिरण्यासाठी येतात. पोहणा-यांसाठीही हा बीच उत्तम आहे. 
 
दीवमध्ये पाहण्याजोगे - 
सेंट पॉल चर्च, दीव फोर्ट, पनीकोटा फोर्ट, घोघला बीच, चिल्ड्रन पार्क आणि समर हाउस येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. 
 
दीवमधील बीच - 
नगोवा बीच - दीवपासून केवळ 20 मिनटांच्या अंतरावर असणारा हा सर्वांत सुंदर बीच आहे. बुटाच्या आकाराचा 2 किमी पर्यंत पसरलेला असल्याने या बीचला पर्यटकांची पहिली पसंत असते. 
 
चक्रतीर्थ बीच - 
हा बीच हिरवाईच्या सौंदर्याने नटलेला आहे. सुंदर उदयाने, खुले स्टेडियम पर्यटकांना मनमुराद आनंदाची संधी देतात. 
 
दमण आणि दीवला कधी याल - 
खरेतर दमण आणि दीवचे समुद्रकिनारे वर्षभरात कधीही गेल्यास बहरलेले असतात. तरीदेखील येथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मे दरम्यान येथील वातावरण उत्तम असते. 
 
कसे याल - 
रस्ता मार्ग - दमणमध्ये 191 किमीचा तर दीवमध्ये 78 किमीचा डांबरी मार्ग आहे. 
जवळचे रेल्वे स्टेशन - पश्चिम रेल्वेच्या दिल्ली-मुंबई मार्गावर दमण आहे. गुजराथमधील 'वापी' हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. मिटरगेज रेल्वे लाइनला जोडले गेले आहे. 
हवाईमार्ग - दमण आणि दीव येथे विमानतळ असून मुंबईस दररोज विमानसेवा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते...