भारत आपल्या संस्कृती आणि चालीरीतींसाठी संपूर्ण जगात विशेष प्रसिद्ध आहे. भारतात अनेक प्राचीन मंदिरे आणि अनेक प्राचीन वास्तू पाहायला मिळतात. तसेच देशातील राजस्थानला इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. राजस्थान आपल्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थान हे वालुकामय राज्य असले तरी इतिहास आणि कला-संस्कृतीमुळे त्याची स्वतःची खास ओळख आहे. तसेच राजस्थानचा इतिहास दरवर्षी अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. राजस्थानातील प्राचीन मंदिरे आणि प्राचीन वास्तू हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रमुख कारण आहे. तसेच राजस्थानमधील उदयपूर मध्ये एक प्राचीन मंदिर आहे ज्याचे नाव आहे एकलिंगजी मंदिर, हे मंदिर अतिशय प्राचीन मानले जाते.
एकलिंग मंदिर-
श्री एकलिंगजी हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे, तसेच भगवान शिवांचे हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. तसेच मेवाड राजपुतांचे हे कुलदैवत आहे, महाराणा प्रातप आणि त्यांचे पूर्वज यांची पूजा करायचेत. येथील शिवलिंगाला चार मुख बनलेले आहे. मंदिर परिसरामध्ये 108 देवी-देवतांचे छोटे छोटे मंदिरे आहे. मंदिरात, भगवान एकलिंगजीची सुमारे 50 फूट उंचीची मूर्ती काळ्या संगमरवरी दगडात बनविली गेली आहे, तसेच राजस्थानच्या या मंदिरात चांदीच्या नागाने कोरलेले शिवलिंग पाहायला मिळते.
एकलिंगजी मंदिर इतिहास-
राजस्थान मधील उदयपूर शहरात असलेले एकलिंगजी मंदिर ई. स. 734 मध्ये बनवले गेले होते. यामंदिराचे निर्माण बप्पा रावल याची केले होते. या मंदिरातील मूर्तींना दिल्ली सल्तनतच्या शासकांनी आक्रमण करून नष्ट केल्या होत्या. नंतर स्थानीय राजांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. त्यानंतर 15 शतकात मालवा सल्तनतचे विघाथ शाह ने मेवाडवर परत आक्रमण केले. व या मंदिराला परत नष्ट केले.नंतर परत कुंभचे पुत्र राणा रायमल ने विघाथ शाहला पराजित करून पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
उदयपूरचे हे मंदिर दोनवेळा दिल्ली सल्तनतीच्या हल्ल्याचे बळी ठरले आहे, परंतु मेवाडच्या लोकांच्या श्रद्धा आणि निष्ठेने आजपर्यंत मंदिर जिवंत ठेवले आहे.
एकलिंगजी मंदिर शिल्प कला-
एकलिंगजी मंदिराची शिल्पकला खूप ही भव्य आणि अद्भुत आहे. जी पर्यटकांना आकर्षित करते. मंदिरामध्ये नक्षीदार टावर, पिरॅमिड स्टाइल छत सोबत बनलेले आहे. उदयपूर शहरातील एकलिंगजी मंदिर प्रामुख्याने पिरॅमिड शैलीचा वापर केला आहे .मंदिरातील भगवान एकलिंगजींची मूर्ती काळ्या संगमरवरी बनलेली आहे. तसेच या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीचे मुख्य मुख चार दिशांना आहेत, म्हणूनच या मूर्तीला चतुर्मुखी मूर्ती असे म्हणतात, ज्याची उंची सुमारे 50 फूट आहे. मंदिरात असलेल्या या मूर्तीची चार मुखे भगवान शंकराची चार रूपे दर्शवतात.
कसे जाव? एकलिंगजी मंदिर-
फ्लाइट-
जर राजस्थानच्या उदयपूर शहरात फ्लाइटने जायचे असेल तर उदयपूर शहराला देशातील प्रमुख शहरांशी जोडणारे महाराणा प्रताप विमानतळावर उदयपूर मध्ये आहे. महाराणा प्रताप विमानतळ मंदिरापासून सुमारे 47 किमी अंतरावर आहे, विमानतळावरून मंदिराकडे जाण्यासाठी टॅक्सी, कॅप बुक करू शकता.
रेल्वे मार्ग-
उदयपूर शहर भारतातील प्रमुख शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. उदयपूर रेल्वे स्टेशनपासून एकनाथ जी मंदिराचे अंतर सुमारे 23 किमी आहे. स्टेशनवरून कॅप किंवा रिक्षा ने देखील मंदिरापर्यंत पोहचता येते.
रस्ता मार्ग-
उदयपूर शहर भारतातील प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडलेले आहे, उदयपूर बसस्थानकावरून मंदिराकडे जाण्यासाठी कॅप, टॅक्सीने जाऊ शकतात.