Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

Scuba Diving
, गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024 (07:30 IST)
India Tourism : भारत देश हा पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे पॅराग्लायडिंगपासून स्कूबा डायव्हिंगपर्यंत सर्वच गोष्टींचा प्रचार झाला आहे. भारतात अशी काही अद्भुत ठिकाणे आहे जिथे स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेता येतो. स्कूबा डायव्हिंग म्हणजे पाण्याखाली पोहणे होय. भारतातील सुंदर ठिकाणी पाण्याखाली पोहण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता. तसेच भारतात स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम काळ शरद ऋतूपासून हिवाळा मानला जातो.  
 
अंदमान निकोबार-
अंदमान आणि निकोबार बेटे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशातून देखील अनेक पर्यटक इथे भेटायला येतात. इथे राधानगर बीच, नील आयलंडसह अनेक समुद्रकिनारे असून या ठिकाणी तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.
 
नेत्राणी बेट-
कर्नाटकपासून अवघ्या 10 किमी अंतरावर नेत्राणी बेट आहे. या भव्य बेटावर स्कुबा डायव्हिंग व्यतिरिक्त बोटिंग, फिशिंग आणि सर्फिंग देखील करू शकता. 
 
रामचंडी बेट-
कोलकात्या जवळील रामचंडी बेटावर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. हे पुरी, ओडिशापासून सुमारे 25 किमी अंतरावर हे बेट आहे. या ठिकाणी मित्रांसोबत स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.
 
लक्षद्वीप-
स्कुबा डायव्हिंगसाठी लक्षद्वीप हे उत्तम ठिकाण आहे. या सुंदर ठिकाणी निळ्या समुद्राखाली कासव, रंगीबेरंगी मासे आणि समुद्री जीव पाहण्याचा आनंद लुटता येतो. येथे अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतात. या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेता येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!