Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Guwahati is a sprawling city गुवाहाटी-ब्रह्मपुत्रा

Guwahati is a sprawling city गुवाहाटी-ब्रह्मपुत्रा
, सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (15:39 IST)
Guwahati is a sprawling city  भारताच्या ईशान्येकडील रमणीय, नैसर्गिकदृष्टय़ा नटलेला आसाम पर्यटकांसाठी चांगले आकर्षण आहे. आसाम म्हणजे मनमार, तिबेट (चीन), भूतान, पूर्व बंगाल (बांगलादेश) या आंतरराष्ट्रीय सीमांना भिडलेला भाग आहे. गुवाहाटी हे आसाममधले महत्त्वाचे शहर. बाजूने जाणारी ब्रह्मपुत्रा नदी, घाटातून चालणारी बस वाहतूक, रमणीय हिरवागार डोंगराळ परिसर, शेती आणि बागाती परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतो.
 
पूर्ण आसामात रेल्वेचे जाळे कमी असून बससेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. या भागांतून तिस्ता, हुगळी, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्या वाहतात. साहजिकच हा परिसर शेतीने संपन्न आहे. इंडस्ट्री म्हणावी तशी नसल्याने शांत, प्रदूषणमुक्त परिसरातून प्रवास होतो. गुवाहाटीजवळ एक मोठा प्रसिध्द तलावही आहे. जिथे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.
webdunia
गुवाहाटी रेल्वेस्थानक प्रशस्त असून आसपासच्या पर्यटकांसाठी भरपूर हॉटेलस् आहेत. तिथून जवळच म्हणजे सुमारे 3 कि.मी.अंतरावर लांब आणि रुंद पात्र असलेली ब्रह्मपुत्रा दिसते. छोटय़ा बोटीने नदीकाठ पार करावा लागतो. बोटीतून ब्रह्मपुत्रा पार करणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच! ब्रह्मपुत्रा जिथे उगम पावते तिथे बेट असून काही (50 ते 60) पायर्‍यांवर चालल्यावर उमानंद महादेव शिवमंदिर आहे. पुढे नवग्रह, वशिष्ठ मंदिर 20 कि.मी.वर असून त्याची बांधणी दगडी आहे.
 
गुवाहाटी रेल्वे स्टेशनहून सुमारे 32 कि.मी.वर मार्बलचे बालाजी मंदिर आहे. ‘कलाक्षेत्र’ या सांस्कृतिक कार्यालयात आसामची सांस्कृतिक झलक पाहायला मिळते. गुवाहाटीपासून 60 कि.मी.वर असलेल्या हाजो इथे विष्णू महादेव मंदिर असून ते चढावर आहे. तलावात पाय  धुवूनच पुढे 70-80 पायर्‍या चढून वर जावे लागते. मंदिर पूर्ण दगडी असून आत कृष्णाच्या पाच वेगवेगळ्या मूर्ती आहेत. या मंदिराला ‘आसामचे खजुराहो’ म्हणतात.
 
गुवाहाटीपासून जेमतेम 40 कि.मी.वर ‘सौलकुची’नावाचे महिला पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. ‘मोगा सिल्क’उत्पादनासाठी ते प्रसिध्द आहे. मेखला आणि साडी हे रेशमाचे दोन प्रकार तिथे मिळतात. मोगा नावाचा रेशमी किडा तिथे विकसित केला जातो. त्यापासून रेशीम काढले जाते.
 
गुवाहाटीच्या अगोदर 4-5 कि.मी.वर रेल्वेचे ‘कामाख्या’ स्टेशन आहे. तिथून डोंगरावर कामाख्या म्हणून पुरातन दगडी बांधणीचे देवीचे जागृत स्थान आहे. देवीच प्रसिध्द शक्तीपीठापैकी हे एक आहे.
 
तिथे देवीची मूर्ती नाही. मंदिराजवळ वास्तवसाठी आणि भोजनासाठी उत्तम सो आहे.
म. अ. खाडिलकर 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gautami Patil नाचताना स्टेजवर पडली गौतमी पाटील