Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युरोप खंडात जाण्याचे प्रवेशद्वार इस्तंबुल

युरोप खंडात जाण्याचे प्रवेशद्वार इस्तंबुल
, शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (08:46 IST)
ग्रीक पुराणकथेतली ट्रॉय सिटी तुर्कस्तानातच तर होती. या सगळ्या ओढ लावणार्‍या गोष्टींमुळे तुर्कस्तान पर्यटकांच्या मनात अगदी रुतून बसत. इतिहासाच्या पुस्तकात भेटलेलं इस्तंबुल. बझेंटाइन, ग्रीक, रोमन, अरब, ऑटोमान किती जणांची राजवट या शहरानं पाहिली! किती लढ्या या शहरासाठी झाल्या त्याची नोंद इतिहासाच्या पानापानांवर लिहिली गेलेली. सुरुवातीला कॉनस्टनटिनोपाल आणि मग इस्तंबुल या नावानं अगदी 1923 तुर्कस्तानची राजधानी म्हणून मिरवणारं हे शहर पर्यटकांना सतत खुणावत राहिलं होतं. आशिया खंडातून युरोप खंडात जाण्यासाठीचं प्रवेशद्वार म्हणून मानाचं स्थान पटकावून बसलेलं हे शहर!
 
इस्तंबुलसाठी अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावं लागतं. विमानतळाची भव्यता आणि आधुनिकता डोळ्यात प्रथमक्षणीच भरते. यांत्रिक आधुनिकतेनं परिपूर्ण असलेल्या या विमानतळावर जरी जगभरातून प्रवासी येत असले तरी इथल्या अनेक अधिकार्‍यांना पुरेसं इंग्रजी येत नव्हतं त्याचा फटका भारतीय पर्यटकांना बसतो. इस्तंबुलचा रस्ता चांगला चौपदरी आणि गुळगुळीत होता. त्याला लगटून दूरवर बाग पसरली होती. या उन्हाच्या वेळी तिथे फारसं कुणी नव्हतं, पण बागेतल्या झाडांची हिरवाई दुरूनही नजरेला थंडाई पुरवत होती, शिवाय या बागेला जवळ जवळ खेटून समुद्राची निळाई सोबत असते. टर्किश लिरा हे इथलं चलन. दोन किंवा तीन टर्किश लिरा देऊन तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात किलगडाच्या फोडी किंवा फळांचे रस विकत घेऊन ते तुम्ही रस्त्यावरच उभे राहून मस्तपैकी फस्त करू शकता. टॅक्सीने काही मिनिटांत इजिप्शियन बाजारात जाऊ शकता. हा बाजार म्हणजे इथलं ओल्ड मार्केट! खूप म्हणजे खूप जुनं. अंदाजे चारशे वर्षांपूर्वीपासून इथे बाजार भरत आलेला आहे. डोक्यावर छप्पर असलेली ही एक पुराणी मंडईच वाटते. आत एक उभा जाणारा आणि एक आडवा जाणारा असे दोन रस्तेदेखील जुन्या मंडईला शोभणारे. रस्त्यांच्या दुतर्फा दुकानं. दुकानांच्या बाहेर झाडून सगळीकडे पोत्यातून अक्रोड, बदाम, पिस्ते अशा वस्तू ठेवलेल्या. त्यादेखील अगदी उगड्यावर. या दुकानांना अगदी खेटून सोन्या-चांदीचे दागिने शोकेसमध्ये विकायला ठेवलेली दुकानंही होती. अत्तराचे सुवासिक बुधले दाखवत गिर्‍हाईकांना हाकारणारे दुकानदार होते आणि त्याच ओळीत टर्किश डिलाइटचा खच. शोकेसमधून अगदी ऊतू जात असलेली तुर्की मिठाईची दुकानंही होती.
 
गुल्हेरमधला बाजार
'गुल्हेर'मधला बाजार विविध वस्तूंनी दुथडी भरून वाहत असतो. तिथे काय नव्हतं! विविध धातूंच्या तसंच काचेच्या सुद्धा सुंदर बांगड्या, ब्रेसलेट्‍स, माळा कमरेला लावून हौसेनं मिरवावे असे कितीतरी प्रकारचे मोत्याचे, चांदीचे, रंगीबेरंगी चकचकीत खडे वापरून नटवलेले छल्ले, रंगीबेरंगी तयार कपडे, दुपट्टे, लहान मुलांची खेळणी, अनंत वस्तू होत्या. इथल्या विविध दुकानांमधून या बाजारपेठेत तरी निदान आम्हाला ब्रँडेड कपडे फारसे दिसले नाहीत. इथे होतं हे सगळ तुर्की बनावटीचं.
 
कसं जायचं
इस्तंबुलसाठी अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावं लागत. विमानतळाची भव्यता आणि आधुनिकता डोळ्यात प्रथमक्षणीच भरते. यांत्रिक आधुनिकतेन परिपूर्ण असलेल्या या विमानतळावर जरी जगभरातून प्रवासी येत असले तरी इथल्या अनेक अधिकार्‍यांना पुरेसं इंग्रजी येत नव्हतं त्याचा फटका भारतीय पर्यटकांना बसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी आल्यावर गळा कापतो