पूल साधारणपणे नदी-नाले वा दर्यांमुळे दुरावलेल्या दोन ठिकाणांना सुरक्षितपणे जोडण्याचे काम करतात. त्यांच्यावर निर्धास्तपण प्रवास करून आपण पलिकडे जातो. मात्र जगामध्ये काही पूल असेही आहेत, ते अतिशय असुरक्षित आणि भयावह दिसतात. जीव मुठीत घेऊनच त्यांच्यावरून प्रवास करावा लागतो. बर्याचदा त्यांच्यावर अपघातही होतात व काहींना जीवालाही मुकावे लागते. जगातील धोकादायक समजल्या जाणार्या अशाच काही झुलता पुलाची ही ओळख..
लॉँगजियांग सस्पेन्शन ब्रिज, चीन
चीनच्या युनान प्रांतातील बाऔशन सिटीमधील या पुलाच्या निर्मितीचे काम अद्याप सुरू आहे. जून २0१६मध्ये तो तयार होण्याची अपेक्षा आहे. मात्र तो अजून बांधून पूर्ण झाला नाही तरीही अतिशय भितीदायक वाटतो. हा पूल चीनमधील सर्वात लांब (सुमारे ८ हजार १00 फूट) असेल. रिव्हर व्हॅलीवर बनविल्या जाणार्या या पुलांची उंचीसुद्धा सुमारे ९00 फूट असेल.
चीनमधील तिआनमेन्शन नॅशनल फॉरेस्ट पार्कमध्ये हा पूल आहे. तिथे एका पर्वतावरील दोन खडकांना जोडणारा हा पूल १४१0 फूट लांब आहे. गेल्यावर्षी ३ डिसेंबरला त्याच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले. जमिनीपासून हा पूल सुमारे ९८४ फूट उंचीवर आहे. इस्रायली आर्किटेक्ट हॅम डोटान याने त्याचे डिझाइन केले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनेही त्याकडे पाहिले जाते. मात्र हा पूलही भित्र्या स्वभावाच्या व ह्रदयविकार असलेल्या लोकांसाठी योग्य समजला जात नाही.
टिटलिस क्लिफ वॉक, स्वीत्झर्लंडस्वीत्झर्लंडच्या एंजेलबर्ग
शहरातील हा पूल हिमखंडापासून सुमारे १५00 फूट उंचीवर आहे. माउंट टिटलिसवर असलेल्या या पुलाचे बांधकाम २0१२मध्ये करण्यात आले होते. समुद्रसपाटीपासून सुमारे ९ हजार फूट उंचीवर असल्यामुळे 'टिटलिस क्लिप वॉक' युरोपमध्ये सर्वात उंच झुलता पूलसुद्धा आहे. अधिकृत वेबसाइटवर या पुलाबाबत असे लिहिले आहे की, त्यावर चालण्यासाठी तुमचे स्नायू लोखंडी केबलप्रमाणे मजबूत असायला हवेत.
वाइन ब्रिज ऑफ इया व्हॅली, जपान
जपानच्या इया खोर्यामध्ये तीन अनोखे पूल असून ते एका खासप्रकारच्या दोरापासून बनविण्यात आले आहेत. हे तिन्ही पूल शेकडो वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे त्यांना हानी होऊ नये यासाठी त्यांची नेहमीच काहीतरी डागडुजी सुरू असते. काही वर्षांपूर्वी या पुलांमध्ये लोखंडी केबलचाही वापर करण्यात आला आहे. अर्थात असे असले तरी कमजोर काळजाच्या लोकांना या पुलावरून प्रवास न करण्याचा सल्ला दिलाजातो. या पुलावर पाऊल ठेवताच अनेकांच्या पोटात गोळा उभा राहतो.
सस्पेन्शन क्लासव्रिज, चीन
चीनच्या हुनान प्रांतातील शिनीउझूई नॅशनल जियोलॉजिकल पार्कमध्ये हा पूल आहे. जमिनीपासून ५९0 फूट उंचीवर बनलेला हा पूल सुमारे ९८४ फूट लांब आहे. या पुलावर चालतेवळी आपण जणू एखाद्या दरीवरूनच तरंगत चाललो आहेत, असे वाटते.