हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांची सर्वात मोठी, सर्वात लांब, सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेणी आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत. चला जाणून घेऊया मुक्तेश्वर हिल स्टेशन बद्दल जे भारतातील सर्वात उंच हिल स्टेशनं पैकी एक आहे.चला जाणून घेऊ या.
मुक्तेश्वर हिल स्टेशन मंदिर -
1 कुमाऊँच्या डोंगरावर वसलेले मुक्तेश्वर हे उत्तराखंडमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे दिल्लीपासून 350 कि.मी.अंतरावर आणि नैनितालपासून सुमारे 48 कि.मी.अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन काठगोदाम आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ पंतनगर आहे. टॅक्सीद्वारे सहजपणे येथे पोहोचता येते.
2 मुक्तेश्वर येथील महादेव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथे टेकडीवर वसलेले शिवकालीन प्रसिद्ध मंदिर आहे. येथे भगवान ब्रह्मा, विष्णू, पार्वती, हनुमान आणि नंदी देखील भगवान शिव यांच्या समवेत विराजमान आहेत. मंदिराच्या बाहेर मोठ्या संख्येने माकडे दिसतात.
3 निसर्ग आणि पर्वतांच्या पायथ्याशी वसलेले मुक्तेश्वर प्रत्येक वेळी नेहमीच इथले हवामान खूपच आल्हाददायक आहे.इथे मार्च ते जून दरम्यान किंवा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान जाणे चांगले आहे.
4 इथे हिमालय,अरण्य,आणि हिरव्यागार झाडांनी भरलेले डोंगर,रसाळ फळांनी भरलेले झाडे,चीड,देवदाराची घनदाट झाडे,रंगीबेरंगी फुले यांचे दृश्य पाहून आपण आनंदी व्हाल.
5 नेहमीच इथे थंडगार वारा वाहत असतो.तिथे गेल्यावर आपल्याला असे वाटते की जणू निसर्ग आपल्या सानिध्यात घेऊन अंगाई गाण्यासाठी आतुर आहे.
6 जर हवामान स्वच्छ असेल तर उगवत्या सूर्याचे सुंदर दृश्य बघू शकतो. हिमालयातील पर्वताच्या शिखराच्या मागे मुक्तेश्वरपासून नीलकंठ, नंदादेवी आणि त्रिशूल सारख्या पर्वतीय शृंखला देखील दिसतात.
7 चौली की जाली नावाचे एक प्रसिद्ध ठिकाण मुक्तेश्वरला आहे. अशी किवंदंती आहे की येथे देवी आणि राक्षस यांच्यात युद्ध झाले होते. हे एका उंच टेकडीवर आहे.याच्या सर्वात उंच खडकावर एक गोल छिद्र आहे.अशी आख्यायिका आहे की या गोल छिद्रामधून जर कोणी निःसंतान स्त्री निघेल तर त्याला अपत्य प्राप्ती होते.
डोंगराच्या माथ्यावरुन दरीचे सुंदर दृश्य पाहणे आश्चर्यकारक आहे.
8 मुक्तेश्वरच्या सभोवताल फिरण्याची बरीच ठिकाणे आहेत. येथून जवळच अल्मोडा, बिनसर आणि नैनिताल आहेत.आपण मुक्तेश्वर जाताना किंवा मुक्तेश्वरावरून परत येताना भीमताल बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
9 मुक्तेश्वरमध्ये सुक्या बटाटाची भाजी आणि कांदा भजे प्रसिद्ध आहेत. चटणी सह कांदा भजी आणि बटाट्याची भाजी अशीच खातात.जर आपल्याला चपाती पाहिजे असेल तर ती ही मिळेल.
10 मुक्तेश्वर हे एक लहान हिल स्टेशन असल्याने येथे राहण्याची आणि खाण्यासाठी पर्याय मिळतील.परंतु येथे आपण पूर्वीपासून राहण्याची व्यवस्था केलेली जास्त चांगली.