Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पर्यटकांना भेट देण्यासाठी ओडिशामध्ये सुंदर आणि अद्भुत तलाव आहे, जाणून घ्या माहिती

पर्यटकांना भेट देण्यासाठी ओडिशामध्ये सुंदर आणि अद्भुत तलाव आहे, जाणून घ्या माहिती
, शनिवार, 22 जानेवारी 2022 (15:10 IST)
ओडिशा पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. भव्य मंदिरे, संग्रहालये आणि मठ, समुद्रकिनारे, जंगले आणि हिरव्यागार टेकड्यांव्यतिरिक्त, येथे काही अद्भुत तलाव आहेत. ओडिशातील सरोवरे नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही आहेत आणि स्थानिक आणि पर्यटक दोघांनीही इथे आवर्जून भेट द्यावी. चला तर जाणून घेऊ या ओडिशातील काही सुंदर तलावांबद्दल 
 
1 चिल्का तलाव - चिल्का तलाव हे ओडिशातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय तलावांपैकी एक आहे. हे भारतातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे. चारही बाजूंनी हिरव्यागार जंगलांनी वेढलेले, चिल्का तलाव बर्ड वॉचिंग, पिकनिक, नौकाविहार आणि मासेमारीसाठी योग्य आहे. नोव्हेंबर ते मार्च हा चिल्का तलावाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे कारण या काळात  सायबेरियातील अनेक स्थलांतरित येथे येतात आणि पर्यटकांना आकर्षित करतात.
 
2 अंसुपा तलाव - महानदीच्या काठावर वसलेले आणि सारनदा टेकड्या आणि बिष्णुपूर टेकड्यांनी वेढलेले, अंसुपा तलावामध्ये अफाट नैसर्गिक सौंदर्य आणि विदेशी वनस्पती आणि प्राणी आहेत. हे तरंगते, बुडलेल्या आणि उदयोन्मुख जलचर वनस्पती आणि अनेक जलचरांचे घर आहे. हा तलाव केवळ वनस्पतिशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञांना आकर्षित करत नाही तर त्याची समृद्ध जैवविविधता देखील अत्यंत लोकप्रिय आहे. तलावाच्या काठावर बसून आपण इथल्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
 
3 पाटा तलाव - छतरपूर शहराजवळ असलेले, पाटा तलाव हे ओडिशातील गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे, ज्याला वर्षभर पर्यटक भेट देतात. सुंदर सौंदर्य  पासून ताजगी अनुभवाला पाटा तलाव हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.
 
4 कांजिया तलाव - जर आपण भुवनेश्वरमध्ये असाल तर आपल्या भटकंतीच्या यादीत कांजिया तलावाची भेट देणं नक्की ठेवा. शहराच्या सीमेवर वसलेले हे सरोवर 66 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेले असून पाण्याचे प्रमुख स्त्रोत मानले जाते. वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्ध जैवविविधतेमुळे ते ओडिशाचे एक महत्त्वाचे सरोवर आहे. नंदन कानन जूलॉजिकल पार्क मधून   बाहेर पडताना किंवा परत येताना लोक साधारणपणे या तलावाला भेट देतात.
 
5 अपर जोंक - हे पाटोरा गावात जोंक नदीजवळ आहे. हे तलाव ओडिशातील लोकप्रिय तलावांपैकी एक आहे. डोंगर आणि जंगलांनी वेढलेल्या या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य उत्कृष्ट आहे आणि येथे येणारी थंड वाऱ्याची झुळूक प्रत्येक पर्यटकाच्या मनाला  ताजेतवाने करते.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नम्रता शिरोडकर वाढदिवस विशेष : नम्रता तिच्या करिअरच्या शिखरावर असताना महेशबाबूच्या प्रेमात पडली