Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे भारतातील 5 सर्वात सुंदर सनसेट स्पॉट्स आहेत, इथले सौंदर्य आपली मने जिंकतील

हे भारतातील 5 सर्वात सुंदर सनसेट स्पॉट्स आहेत, इथले सौंदर्य आपली मने जिंकतील
, शुक्रवार, 2 जुलै 2021 (20:08 IST)
निसर्गाकडे मानवांला देण्यासाठी अनेक खास गोष्टी आहेत पण लोक त्यांच्या ऑफिसात आणि घरगुती समस्यांनी वेढलेले असतात.या सर्वांच्या दरम्यानही कधी कधी असं वाटते की एखाद्या शांत जागेवर जाऊन बसायला हवे, तर मग आम्ही अशा काही ठिकाणांविषयी सांगत आहोत जिथे सूर्यास्त व सूर्योदय सर्वात सुंदर दिसतात.
 
1 डल तलाव, श्रीनगर- या मंत्रमुग्ध करणारा तलावातील सूर्यास्ताचे दृश्य बघणे  एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, सूर्योदय व सूर्यास्त येथे बघण्यासारखे आहे. सरोवरात तरंगणाऱ्या हाऊसबोट्सच्या खिडक्यांमधून सूर्योदय व सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य आपल्याला वेगळ्या जगात असल्याचे अनुभव देतात.
 
 
2 राधानगर बीच, हॅवलोक आयलँड,अंदमान- हे अंदमान निकोबार बकेट लिस्ट मध्ये असले पाहिजे.जेव्हा आपण या बेटांवर सहलीची योजना बनवाल, तेव्हा या समुद्रकिनार्‍याला नक्की भेट द्या.हा समुद्रकिनारा आशियातील एक उत्तम समुद्रकिनारा मानला जातो, हा भारतातील सर्वोत्कृष्ट सनसेट पॉईंट पैकी एक आहे.
 
 
3 लेह लडाख- एकदा स्वत: च्या डोळ्यांनी लेह लडाखच्या सुंदर खोऱ्यात जाऊन सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा जादुई देखावा बघा, हे आपल्याला तिथेच राहण्यास भाग पाडेल.
 
 
4 उमीयम तलाव, मेघालय-या पूर्वोत्तर राज्यातील लोक भाग्यवान असतात यांना आपल्या घरांच्या खिडकीतून आकाशाचे हे सुंदर दृश्य बघू शकतात.आपण जेव्हा शिलॉंगला भेट द्याल ,तेव्हा येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अवश्य पहा.
 
 
5 कन्याकुमारी, तामिळनाडू- भारतातील दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारी सर्वात प्रसिद्ध सूर्यास्त स्थळांपैकी एक आहे. येथील नयनरम्य आणि मोहक दृश्य वर्षभर पर्यटक आणि छायाचित्रकारांना आकर्षित करतात.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाहीतर "तुम्हाला"