आंध्र प्रदेशात अनेक समुद्र किनारे आहेत. उदाहरणार्थ , मंगीनापुडी बीच, भिमुनीपट्टणम बीच, मायपाडू बीच, वोडारेऊ बीच, रामकृष्णा बीच, ऋषिकोंडा बीच, सूर्यलंका बीच, यनम बीच, उडप्पा बीच इत्यादी. पण या सर्वात मच्छलीपट्टणम मांगीनापुडी याला तोड नाही.
मच्छलीपट्टणम बीच :
1 आपल्याला विकेंड साजरा करायचा असेल तर हिल स्टेशन किंवा इतर ठिकाणी जाण्यापेक्षा मच्छलीपट्टणम बीचला जाण्याचा प्लान करू शकता. या बीचचे सौंदर्य देखणाजोगते आहे.
2 कृष्णाडेल्टा जवळ असलेल्या या बीच वरून समुद्राचे दृश्य पाहणे खूप आनंददायी आहे.
3 दरम्यान, आपण मासेमारीसाठी बोट देखील भाडयाने घेऊन डेल्टाचा फेरफटका मारू शकता.
4 मांगीनापुडी बीच हे आंध्रप्रदेशात आहे. जे मच्छलीपट्टणम शहरापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आहे.
5 या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कृष्णाउत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच त्या वेळी या समुद्रकिनाऱ्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येथे रात्रभर संगीत आणि नृत्य सुरु असते.
6 मछलीपट्टणम शहरात बघण्यासारखे इतर ठिकाण देखील आहे. जसे पांडुरंगा स्वामी मंदिर, लाईट हाऊस, भगवान शिवाचे मंदिर, मच्छलीपट्टणम चर्च, साई महाराज देवालय इत्यादी .