Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निर्मला सीतारमण यांनी कोरोना लसीविषयी ही मोठी माहिती दिली, काय म्हणाल्या ते जाणून घ्या?

निर्मला सीतारमण यांनी कोरोना लसीविषयी ही मोठी माहिती दिली, काय म्हणाल्या ते जाणून घ्या?
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (14:03 IST)
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस (corona vaccine)देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला 
सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
 
बिहार निवडणुकीसाठी भाजपाने ११ संकल्प असणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अगदी करोनाच्या लसीपासून ते रोजगार आणि अल्पबचत गटांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. आयसीएमआरने परवानगी दिल्यानंतर बिहारमधील सर्व व्यक्तींना करोनाचा लस मोफत दिली जाईल असं जाहीरमान्यात म्हटलं आहे.
 
बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल त्यांना योग्य माहिती आहे. कोणी आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला योग्य उत्तर नक्कीच देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचं आत्मविश्वासाने सांगू शकतो, असं सीतारामान यांनी यावेळी म्हटलं आहे.

काय काय आहे भाजपाच्या जाहीरनाम्यात
१) कोरानाची लस (corona vaccine) आल्याबरोबर निःशुल्क देणार
२) मेडीकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार
३) ३ लाख शिक्षकांची भरती करुन घेणार
४) बिहारला आयटी हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार
५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्था उभ्या करणार
६) एक लाख लोकांना आरोग्य क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध करुन देणार
७) बिहारमधील दरभंगामध्ये २०२४ पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थानची (एम्स) उभारणी करणार
८) धान्य आणि गव्हाबरोबरच आता सरकार डाळीही विकत घेणार
९) २०२२ पर्यंत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ३० लाख लोकांना पक्की घर बांधून देणार
१०) गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार
११) दुग्ध उत्पादनासंदर्भातील १५ नवे उद्योग सुरु करणार

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुक वापरकर्त्यांसाठी हे खास फीचर घेऊन आले आहे, आता शेजार्यांविषयी जाणून घेणे सोपे होईल