rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही माझी शेवटची निवडणूक : नितीशकुमार

This is my last election
पुर्निया , शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (14:33 IST)
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीशकुमार यांनी यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर केले. तिसर्या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते. आपली ही शेवटची निवडणूक असल्याने जनतेने जेडीयूला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
तसेच पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुर्निया जिल्ह्यातील प्रचारादरम्यान नितीशकुमारांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान   नितीशकुमार यांच्या प्रचारादरम्यान त्यांना अनेक निषेध आंदोलनांना सामोर जावे लागले हे विशेष. 
 
यावेळी त्यांनी ‘अंत भला, तो सब भला' असा डायलॉगही मारला. नितीशकुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर लोक जनशक्ती पार्टीचे नेते अजय कुमार म्हणाले, मी कायमच नितीशकुमार यांनी निवृत्त व्हावे या मताचा होतो. आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केलीच आहे तर त्यांनी जेडीयूतील मुख्यमंत्रीपदासाठीच्या नव्या चेहर्यांची घोषणा करावी. तर राष्ट्रीय लोकसमाज पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी नितीशकुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांना आशीर्वाद देऊन त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याआचा सल्ला दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीनंतर सोने महागणार