rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचे अमूल्य रत्न

about dnyaneshwar maharaj
, शुक्रवार, 12 जून 2020 (06:35 IST)
संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील तेराव्या शतकातील थोर संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. संत ज्ञानेश्वर हे भारतातील महान आणि थोरवन्त कवी आणि संतांमध्ये गणले जातात.
 
हे संत नामदेवांचे समकाळातील होते त्यांच्यासोबत राहून ह्यांनी महाराष्ट्राच्या घरा घरामध्ये ज्ञान आणि भक्तीची ओळख करून दिली. आणि संत आणि समभावाचे धडे शिकवले. हे महाराष्ट्र संस्कृतीचे आद्यप्रवर्तक मानले जातात.

ज्ञानेश्वर माउली यांचा जन्म सन 1275 इ. मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्णातील पैठण जवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगावामध्ये भाद्रपदातील कृष्णपक्षातील अष्टमीला झाला. यांचा वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे.यांचे वडील उच्चस्थ मुमुक्ष आणि विठ्ठलनाथाचे उपासक होते. वैवाहिक जीवनानंतर त्यांनी सन्यास घेतले पण आपल्या गुरूंच्या आदेशावरून परत गृहस्थ आश्रमात आले. त्यांना चार अपत्य झाले निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. 
 
सन्यास घेतल्यानंतर त्यांना अपत्ये प्राप्ती झाल्यामुळे त्यांना संन्यासींची मुले म्हणून अपमान मिळत असे. विठ्ठलपंतांनी सामाजिक आज्ञेनुसार मरण पत्करावे लागले होते. 
 
लहानग्या ज्ञानेश्वराच्या डोक्यावरून आई वडिलांची छत्रछाया गेली. त्याकाळी सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये असायचे कोणालाही संस्कृत येत नसे. पण तेजस्वी असे ज्ञानेश्वरांनी फक्त वयाच्या 15 व्या वर्षी गीतेवरील मराठीमध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. 
 
खूपच लहानग्या वयात ह्यांना वेगवेगळ्या संकटातून जावे लागले. त्यांच्याकडे वास्तव्यास साठी घर देखील नसे. हे सर्व भाऊ बहीण शुध्दीपत्र प्राप्तीसाठी धर्मक्षेत्र पैठण गेले. अशी आख्यायिका आहे की इथे त्यांनी त्यांची चेष्ठा करणाऱ्या ब्राह्मणाच्या समोर म्हशीच्या तोंडातून वेदांचे उच्चारण करविले होते. ह्यांनी तपस्वी चांगदेव च्या स्वागतासाठी ज्या भिंतीवर बसले होते तीच भिंत चालवली होती. मराठीच्या गाण्यामध्ये ही ओळ "चालविली जड भिंती। हरविली चांग्याचीं भ्रांती" म्हटली जाते. ह्याचा या चमत्कारामुळे प्रभावित होऊन त्यांना पैठणच्या विद्वानांनी शुध्दीपत्रक दिले. शुध्दीपत्रक घेउन हे चौघे प्रवरा नदीच्या काठी नेवासे गावात पोहोचले. 
 
ज्ञानेश्ववरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाच्या गहिनीनाथांकडून ज्ञान मिळाले असे. जे त्यांनी ज्ञानदेवांच्याद्वारा आपल्या बहिणी मुक्ताबाईंकडे पोहोचविले. ज्ञानदेवांनी आबाळवृद्धांना आध्यात्माची ओळख करून देण्यासाठी मराठीमध्ये श्रीमद् भगवद्गीतेवर भाष्य लिहिले. ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. हे पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांनी आपल्या राजकीय तत्वांशिवाय स्वतंत्र अनुभवणारे अमृतानुभव नावाचे दुसरे ग्रंथ लिहिले. तत्पश्चात हे चौघे भाऊ बहीण पुण्याचा जवळ आळंदी गावामध्ये आले. इथून ह्यांनी योगीराज चांगदेवांना 65 ओव्यांचे पत्र लिहिले जे महाराष्ट्रात ' चांगदेव पाषष्ठी च्या नावाने प्रख्यात आहे.
 
लहानांपासून ते महताऱ्यांपर्यंत सर्वाना भक्तिमार्गाला लावून भागवत धर्म स्थापित करून आळंदी मध्ये युवावस्थेत 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाच्या वयात जिवंत समाधी घेण्याचे ठरवून या संसाराचा त्याग करून आपले नश्वर शरीर सोडले. 
 
ज्ञानदेवांच्या समाधी घेण्याच्या क्षणाचे वृत्तांत संत नामदेवांनी आपल्या लेखामध्ये लिहिले आहे. ते लिहितात की आपले गुरु निवृत्तीनाथांना शेवटचे नमस्कार करून ज्ञानदेव स्थितप्रज्ञ होऊन समाधिमंदिरात जाऊन बसले. त्यांचा गुरूंनी समाधिमंदिराचे दार बंद केले. 
 
ज्ञानेश्वरांनी ही जिवंत समाधी आळंदी गावात संवत मध्ये शके 1217 (वि.संवत 1353 (सन 1296) च्या मार्गशीर्ष वदी(कृष्ण) त्रयोदशीला घेतली जे आता पुण्यापासून तब्बल 14 किलोमीटर लांब प्रख्यात तीर्थक्षेत्र बनले आहे. 
 
ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि अभंग या रचना सर्वमान्य आहे. महाराष्ट्रामध्ये ह्यांचा ग्रन्थ ज्ञानेश्वरीला ;माउली ' असे देखील म्हटले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत तुकाराम महाराज