Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महर्षी धोंडो केशव कर्वे

महर्षी धोंडो केशव कर्वे
, रविवार, 6 जून 2021 (09:30 IST)
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 ला रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यामधे शेरावली या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव केशव बापूराव कर्वे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई केशव कर्वे होते. त्यांचे बालपण मुरूड या रत्नागिरी जिल्हयातील एका गावात गेले. 
 
महर्षींनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले 104 वर्षांचे जीवन वाहिले.शिक्षणा साठी त्यांना फार परिश्रम घ्यावे लागले, दुरवर पायपीट करावी लागायची. ते मॅट्रिक झाल्यानंतर मुंबई येथील एल्फिन्स्टन काॅलेजात गणिताची पदवी घेण्याकरता त्यांनी प्रवेश मिळवीला. कर्वेंनी त्या वर्षी फर्ग्युसन काॅलेज येथे गणित हा विषय शिकविण्यास सुरूवात केली.1914 पर्यंत त्यांचं हे कार्य सुरू होतं.
 
कर्वे 14 वर्षांचे असतांना त्यांचा विवाह 8 वर्षांच्या राधाबाईंशी झाला. वयाच्या 27 व्या वर्षी बाळांतपणात राधाबाईंचा मृत्यु झाला.राधाबाईंच्या मृत्यू नंतर कर्वेंना पुनर्विवाह करण्यासाठी आग्रह धरला गेला.त्यावेळी त्यांचे वय 45 होते.त्या काळी प्रौढ विधुरांचा विवाह लहान वयाच्या कुमारीकेशी लावुन देण्याची प्रथा होती.
 
परंतु जर मुलीच्या पतीचे लवकर निधन झाले तर तिला मात्र तीचं आयुष्य विधवा म्हणुन व्यतीत करावे लागेल. महर्षी कर्वेंना ही बाब अजिबात मान्य नव्हती म्हणून त्यांनी पंडीता रमाबाईंच्या शारदा सदन येथे वास्तव्यास असलेल्या गोदुबाई या विधवेशी पुर्नविवाह केला.
 
समाजाला ही गोष्ट अजिबात रूचली नाही.त्यांचा सामाजिक बहिष्कार करण्यात आला. या गोष्टींचा देखील त्यांनी खूप धिटाईने सामना केला. गोदुबाई पुढे आनंदी कर्वे व बाया कर्वे या नावाने प्रसिध्द झाल्या.त्यांनी महर्षी कर्वे यांना खूप साथ दिली.त्या खंबीरपणे त्यांच्या बरोबरीने उभ्या राहिल्या.महर्षी कर्वेंची 4 मुलं रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनी देखील अनेक क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य केले आहे
 
कर्वेंनी पुर्नविवाहविधवा विवाह प्रतिबंध निवारक’ मंडळाची स्थापना देखील केली.बालविवाहा सारख्या कुप्रथा बंद व्हाव्यात म्हणून त्यांनी  अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली.विधवांकरता वसतीगृहाची त्यांनी निर्मीती केली.त्यांनी  विधवा महिलांसाठी महिला विद्यालयाची स्थापना केली. या विद्यालयात महर्षी कर्वेंची 20 वर्ष वयाची विधवा मेहुणी ’पार्वतीबाई आठवले’ पहिली विद्यार्थिनी म्हणून होती.महर्षी यांनी आश्रमाच्या शाळेच्या कार्यासाठी मनुष्यबळ पाहिजे होते,त्यासाठी त्यांनी 'निष्काम कर्ममठांची स्थापना केली.पुढे त्याचे नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था नंतर ’महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ असे करण्यात आले. 
जपानचे महिला विद्यापीठ बघून त्यांनी प्रभावित होऊन पुणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना केली.
 
विठ्ठलदास ठाकरसी यांच्या कडून त्यांना 15 लक्ष रुपयांचे अनुदान मिळाल्यामुळे त्या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ देण्यात आले.
 
विधवा महिलांचे प्रश्न त्यांचे शिक्षण याकरीता कर्वेंनी भरीव कार्य केलं. अस्पृश्यता, जातीभेद, जातीव्यवस्था या विरोधात देखील त्यांनी आवाज उचचला.स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळावी या साठी आणि स्त्रियांना शिक्षण मिळावे या साठी खूपच मोलाचं कार्य केले आहे.त्याचे निधन वृद्धापकाळाने 9 नोव्हेंबर 1962 साली पुण्यात झाले.
 
अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. पद्मविभूषण' हा किताब त्यांना प्रदान करण्यात आला, तर लगेच  त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले.त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोनाचा वेग कधी थांबणार?13 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली.