Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणी लक्ष्मीबाई जयंती 2022:झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी जाणून घ्या

rani lakshmibai
, शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (09:27 IST)
19 नोव्हेंबर रोजी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती असते.  त्या 1857 च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वीर स्त्री होत्या. त्यांनी कधीही परकीय आक्रमक व राज्यकर्त्यांची गुलामी स्वीकारली नाही आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ या.
 
1 मणिकर्णिका नाव ठेवले - झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा जन्म वाराणसी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. लहानपणी त्यांचे नाव मणिकर्णिका होते. त्यांना प्रत्येक जण लाडाने 'मनू' म्हणत होते. वाराणसीच्या घाटावर त्यांचे नाव मणिकर्णिका ठेवले ज्या ठिकाणी माता सतीचे कानातले पडले होते. 
 
2 आईचा मृत्यू - वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले त्यामुळे मनूच्या सगळ्या संगोपनाची जवाबदारी त्यांच्या वडिलांवर पडली.
 
3 मुलाचे निधन - 1842 मध्ये मनूचे लग्न झाशीचे राजा गंगाधर रावांशी झाले. लग्नानंतर मनूचे नाव 'लक्ष्मीबाई' ठेवण्यात आले. 1851 मध्ये ह्यांना एक पुत्र झाले पण 4 महिन्यानंतर त्या मुलाचे निधन झाले.
 
4 पतीचा मृत्यू - नंतर, जेव्हा त्यांच्या पतीची तब्येत ढासळत गेली तेव्हा त्यांना सर्वांनी वारस म्हणून एक मुलगा दत्तक घेण्याचे सुचवले. या नंतर त्यांनी दामोदर राव यांना दत्तक घेतले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराजा गंगाधरराव यांचे निधन झाले. त्यावेळी लक्ष्मीबाई केवळ 18 वर्षाच्या होत्या. त्या एकट्याच राहिल्या पण त्यांनी आपले धैर्य सोडले नाही आणि आपले कर्तव्य समजले आणि चोखरित्या बजावले.
 
5 ब्रिटिशांचा आक्षेप - ज्या वेळी दामोदर यांना दत्तक घेतले त्यावेळी ब्रिटिशांचे शासन होते. ब्रिटिश सरकारने दामोदर यांना झाशीच्या वारस मानण्यास नकार दिला आणि ते झाशीला आपल्या शासनात मिळविण्याचे कटकारस्तान रचू लागले. त्यावेळी डलहौसी नावाचा व्हाईसराय ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी होता. राणीला हे कळल्यावर त्यांनी वकिलाच्या मदतीने लंडनच्या कोर्टात दावा दाखल केला, परंतु ब्रिटिशांनी त्यांची याचिका नाकारली.
 
6 राजवाडा सोडण्याचे आदेश - मार्च 1854 मध्ये ब्रिटिश सरकारने राणीला महाल सोडण्याचा आदेश दिला पण राणीने ठरवले की मी झाशी कधीही सोडणार नाही. या साठी त्यांनी स्वतःसह झाशीला देखील मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली. पण ब्रिटिश सरकारने त्यांचे सर्व प्रयत्न नाकाम करण्याचे प्रयत्न केले.
 
7 शेजारच्या राज्यांचा हल्ला- झाशीच्या शेजारचे राज्य ओरछा, दतियाने झाशीवर हल्ला केला, पण राणीने त्यांचा हेतू नाकाम केले.
 
8 इंग्रेजांचा हल्ला- 1858 मध्ये ब्रिटिश सरकारने झाशीवर हल्ला करून त्यावर ताबा घेतला, तरीही राणीने धीर सोडले नाही. त्यांनी पुरुषांचा पोशाख घातला आणि आपल्या मुलाला दामोदराला आपल्या पाठीशी बांधले. दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्याच्या लगाम तोंडात धरून त्यावर स्वार होऊन युद्ध करत शेवटी आपल्या दत्तक पुत्र आणि काही साथीदारांसह तिथून निघाल्या.
 
9 तात्या टोपेंशी भेट - झाशी सोडल्यावर राणी तात्या टोपेंशी जाऊन भेटल्या. ब्रिटिश आणि काही चापलूस भारतीय राज्य देखील राणीचा शोध घेण्यासाठी पाठलाग करत होते.  
 
10 देशाचे गद्दार - तात्यांना भेटल्यावर राणीलक्ष्मीबाई ग्वाल्हेर साठी निघाल्या. देशाच्या गद्दारांमुळे राणीला वाटेत शत्रूंचा सामना करावा लागला. मोठ्या शौर्याने आणि धीराने राणीने लढाई केली आणि युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी (18 जून 1858) रोजी 22 वर्षाची ही महानायिका लढत-लढत मरण पावली. 
 
राणी लक्ष्मीबाई यांचा कारकीर्दीला मानाचा मुजरा.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मी शिवाजी महाराजांचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे – राहुल गांधी