rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वामी विवेकानंद उच्च विचारसरणी असणारे महान व्यक्तिमत्त्व

Swami Vivekananda is a great personality essay in marathi
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (19:09 IST)
स्वामी विवेकानंद हे  उच्च विचाराचे महान व्यक्ती होते.त्यांच्या विचारांचा   आध्यात्मिक,ज्ञान, आणि सांस्कृतिक अनुभवाचा प्रत्येक व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो. ते तरुणांसाठी मार्गदर्शक आणि भारताचा अभिमान आहे.     
 
स्वामी विवेकानंद ह्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. ह्यांचे नाव नरेंद्र दत्त होते. ह्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त होते आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते, त्या धार्मिक विचारसरणीच्या महिला होत्या.त्यांना रामायण आणि महाभारत अशा धार्मिक ग्रंथाचे ज्ञान होते. त्या अत्यंत प्रतिभावान महिला होत्या. इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान होते.  त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त पाश्चात्त्य संस्कृतीत विश्वास ठेवायचे आणि ते आपल्या मुलाला म्हणजे नरेंद्रला देखील इंग्रजी शिकवून पाश्चात्त्य संस्कृतीची शिकवण देऊ इच्छित होते. नरेंद्र ह्यांची बुद्धी लहान पणापासून तल्लख होती.  त्यांच्यामध्ये आई वडिलांचे चांगले गुण आले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक नवा आकार मिळाला आणि ते उत्तम गुणवत्तेचे धनी झाले. त्यांच्या मध्ये देवप्राप्ती करण्यासाठी  प्रबळ तळमळ होती. या साठी ते ब्रह्म समाजात गेले तरी ही त्यांना काही समाधान मिळाले नाही. त्यांनी ललित कलेची परीक्षा 1881 मध्ये उत्तीर्ण केली. नंतर 1884 मध्ये त्यांनी कलेचे शिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी त्यांनी बीएची परीक्षा चांगल्या पात्रतेने उत्तीर्ण केली आणि कायद्याचा अभ्यास केला.  
 
वर्ष 1884 मध्ये श्री विश्वनाथ दत्त ह्यांचे निधन झाले. घराची सर्व जबाबदारी नरेंद्र ह्यांचा वर आली. घराची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यामध्ये चांगले असे की नरेंद्र ह्यांचे लग्न झालेले नव्हते. त्यांनी घराची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली. गरीब असून त्यांचे मन खूप मोठे होते. त्यांच्या कडे आलेल्या पाहुण्यांचे आतिथ्य ते प्रेमाने करायचे. स्वतः उपाशी राहून पाहुण्यांना जेवण पुरवत असे. स्वतः थंडीमध्ये, पावसाळ्यात भिजत राहून रात्र भर जागरण करून पाहुण्यांना पलंगावर झोपवायचे. 
 
रामकृष्ण परमहंसाची स्तुती ऐकून नरेंद्र त्यांच्या कडे तर्कशक्तीच्या विचाराने गेले होते. परमहंस ने त्यांना बघूनच ओळखून घेतले की हे तेच शिष्य आहे ज्यांची ते बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते.नरेंद्र ह्यांना देखील परमहंसाच्या कृपेने आत्म-साक्षात्कार झाला आणि ते परमहंसाच्या प्रमुख शिष्यांपैकी एक झाले. निवृत्ती घेतल्यावर त्यांचे नाव विवेकानंद झाले.
 
स्वामी विवेकानंद ह्यांनी आपले संपूर्ण जीवन आपल्या गुरुला म्हणजेच स्वामी रामकृष्ण परमहंस ह्यांना समर्पित केले. त्यांच्या गुरुंची तब्येत खालावली होती गुरूंच्या देह-त्यागाच्या वेळी आपल्या कुटुंबाच्या नाजूक परिस्थितीची काळजी न करता स्वतःच्या जेवणाची काळजी न घेता आपल्या गुरुंची सेवा करत राहिले. त्यांच्या गुरुचे शरीर खूप थकले होते. कर्करोगामुळे घशातून थुंकी,रक्त कफ, बाहेर पडत होते. विवेकानंद सर्व काळजी पूर्वक स्वच्छ करायचे.
 
एकदा एखाद्याने गुरुदेवांच्या सेवेचा तिटकारा करून निष्काळजी पणा केला. हे बघून विवेकानंद ह्यांना राग आला. त्यांनी त्या गुरुबंधूंना प्रेमाने समजावून गुरुदेवांच्या प्रत्येक वस्तूंवर आपले नितांत प्रेम दर्शवित गुरुदेवांच्या पलंगाच्या जवळ रक्त,कफ ने भरलेल्या थुंकीचे पात्र प्यायले.
 
आपल्या गुरूंच्या प्रतीचे आदर आणि भक्ती मुळेच ते आपल्या गुरुंची आणि त्यांच्या आदर्शांची उत्तम सेवा करू शकले आणि गुरुला समजू शकले. त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाला गुरुदेवच्या स्वरूपात विलीन केले. संपूर्ण जगात भारताच्या अमूल्य आध्यात्मिक खजिन्याची सुगंध पसरविली. अशी होती त्यांची गुरुभक्ती आणि गुरूच्या प्रति अनन्य निष्ठा.
 
नरेंद्र ह्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी भगवे वस्त्र धारण केले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारताचा पायीच प्रवास केला. 
वर्ष 1893 मध्ये शिकागो (अमेरिका)येथे जागतिक धर्म परिषद झाले.त्याचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद ह्यांनी केले. त्यावेळी युरोप- अमेरिकेचे लोक पराधीन भारतीयांना हीन दृष्टीने बघायचे. त्यावेळी लोकांनी खूप प्रयत्न केले की स्वामी विवेकानंद ह्यांना सर्व धर्म परिषदेत बोलायला वेळच मिळू नये. एका अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नाने त्यांना बोलण्यासाठी काही वेळ देण्यात आला. त्यांची विचारणा  ऐकून सर्व विद्वान आश्चर्यचकित झाले. त्यांच्या भाषणानंतर त्यांचे अमेरिकेत खूप स्वागत झाले. तेथे देखील त्यांचे अनुयायी झाले. ते तीन वर्ष अमेरिकेत राहिले आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रकाश पसरविला. 
 
'आध्यात्मवाद आणि भारतीय तत्त्वज्ञानांशिवाय जग अनाथ होईल' असं स्वामी विवेकानंदांचा दृढ विश्वास होता.त्यांनी अमेरिकेत रामकृष्ण परमहंस मिशनच्या अनेक शाखांचे स्थापन केले. अनेक अमेरिकी विद्वानांनी त्यांचे शिष्यत्व ग्रहण केले.    
 
4 जुलै 1902 रोजी त्यांनी देह सोडले. ते नेहमी स्वतःला घोर गरिबांचे सेवक म्हणवत असायचे. त्यांनी भारताचा अभिमान देश-देशांतरात वाढविण्याचा प्रयत्न केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोबाईलवर दंग असल्यामुळेच पोलिओ लशीऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा ठपका