Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस म्हणाले आता पुढची लढाई मुंबईत होणार

फडणवीस म्हणाले आता पुढची लढाई मुंबईत होणार
, शनिवार, 12 मार्च 2022 (11:16 IST)
बीजेपीने पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच पैकी 4 मध्ये विजय प्राप्त केलं आहे. आणि याच कारणामुळे पार्टी आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या विजयानंतर बीजेपी नेता देवेंद्र फडणवीस गोवा पोहचले जेथे त्यांचे जोरदार स्वागत झाले. या दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आता सेना याच अर्थ शिवसेना नव्हे तर बीजेपीची सेना असा आहे.
 
त्यांनी म्हटले की सेनाचा अर्थ 'बीजेपी सेना' आहे शिवसेना नाही...शिवसेनेची लढाई तर नोटा सोबत आहे बीजेपीसोबत नाही, एनसीपी आणि शिवसेना यांचे वोट नोटाहून देखील कमी आहे... प्रमोदला पाडू इच्छित असलेले सावंत स्वत: हरले आहेत. मुंबईत होणार्‍या बीएमसी निवडणुकीबद्दल फडणवीस म्हणाले की आता पुढील लढाई मुंबईत होणार. त्यांनी म्हटले की ''आता लढाई मुंबईत होणार, महापालिका निवडणुकीची लढाई... आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत... उत्तर प्रदेश सिर्फ एक झांकी है, महाराष्ट्र अभी आना बाकी है.''
 
भाजपचा मोठा विजय
उत्तराखंड, गोवा आणि मणीपूर याशिवाय उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात भाजपने आपली सत्ता कायम ठेवली, तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये तीन-चतुर्थांश बहुमताने "प्रचंड विजय" मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे 'नवा इतिहास' रचून, जवळपास तीन दशकांनंतर उत्तर प्रदेशात सत्तेवर परतणारे सरकार परत आले आहे. यासह, भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) होळी साजरी करण्याचा प्रसंग आठवडाभर आधीच आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रेड 130 रुपये, पेट्रोल 254 रुपये लिटर, येथे महागाई गगनाला भिडली