Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगनाचे पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्य

कंगनाचे पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्य
आपल्या बिनधास्त वक्तव्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणावत प्रसिध्द आहे. तिच्या आदित्य पांचोली, अध्ययन सुमन आणि अलीकडेच ह्रतिक रोशन यांच्यासोबत डेटिंग आणि रोमान्सच्या गोष्टी चर्चेत आल्या होत्या. तिने पुन्हा एकदा ‘एका पेक्षा अधिक लग्न करण्यास हरकत काय आहे?’ असे बिनधास्त वक्तव्य केले आहे.
 
रविवारी कंगना डिझायनर मानव गंगवानीने तयार केलेली वस्त्रे परिधान करुन आयसीडब्ल्यूच्या रॅम्पवर उतरली होती. या ङ्खॅशन शोचा हा शेवटचा दिवस होता. गंगवानी यानेच आपल्या लग्नाची वस्त्रे डिझाइन करावीत अशी कंगनाची इच्छा आहे. मला ही वस्त्रे परिधान करताना एकदम स्पेशल वाटते. 
 
माझ्या पहिल्या लग्नच्या वस्त्रांबद्दल मी गंगवानीसोबत बोलले आहे, तो माझ्यासाठी डिझाइन करणार आहे, असे कंगना म्हणाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुलतानसाठी सलमानने घेतले 106 कोटी!