Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका पादुकोणने रचला इतिहास, या गोष्टीसाठी बनली आशियात नंबर वन

दीपिका पादुकोणने रचला इतिहास, या गोष्टीसाठी बनली आशियात नंबर वन
मुंबई , शनिवार, 1 ऑक्टोबर 2016 (16:29 IST)
बॉलीवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोणने फॅन फॉलोविंगप्रकरणात एक नवीन इतिहास रचत ट्विटरवर फालोवर्सच्या बाबतीत नंबर वनचा किताब मिळवला आहे.  
 
मिळालेल्या आकड्यांनुसार ट्विटरवर दीपिकाला फॉलो करणार्‍यांची संख्या आता 16. 1 मिलियन अर्थात एक कोटी 60 लाखापेक्षा जास्त झाली आहे. आशियात ट्विटरवर कुठल्याही महिलेला फॉलो करण्याच्या बाबतीत आता दीपिका पहिल्या स्थानावर आहे. दीपिकाने आपल्या या नवीन पराक्रमामुळे इंडोनेशियन स्टार अग्नेजला मागे सोडले आहे. ट्विटरवर 'मो'चे आता 15.8 मिलियन फालोवर्स आहे. दीपिकाचे   ट्विटर फॉलोविंग वाढण्यामागे फक्त तिच्या चित्रपटाची कथा नव्हे तर ट्विटरच्या लाइव्ह चॅटमध्ये तिचे सक्रिय भाग घेणे, आपल्या फॅन्सची इच्छा पूर्ण करणे आणि खास मोक्यावर लोकांना स्वत: अभिनंदन करण्याची सवय आहे.  
 
तसं तर दीपिका काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये नंबर वन बनली आहे. पीकू सारखे चित्रपटात उत्तम अभिनय, बाजीराव मस्तानीचे यश, ढेर सारे अवार्ड आणि आता हॉलिवूडचे चित्रपट 'ट्रिपल एक्स- रिटर्न ऑफ़ एक्सजेंडर केज'मध्ये विन डीजलसोबत जोडी बनवून या 'शटल गर्ल'ने साबीत केले आहे आहे की ती मागे नाही आहे. नुकतेच फ़ोर्ब्स मॅगझिन ने दीपिकाला टॉप १० हाइएस्ट पेड एक्ट्रेस म्हणून निवडले, जी तिच्यासाठी सुवर्ण संधी आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सनी भारतात तरी निर्दोष