Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सनी भारतात तरी निर्दोष

सनी भारतात तरी निर्दोष
, शनिवार, 1 ऑक्टोबर 2016 (11:13 IST)
प्रौढ वेबसाईटवर अश्लील, आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ टाकल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री, पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात दाखल केला होता.त्याबाबत गुन्हा निकाली काढण्यात आला आहे. चिपळूणमधील शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने तक्रार दिली होती. हे आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ विदेशातून अपलोड झाले असल्यामुळे हा गुन्हा निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर झालेल्या सेंट्रल इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या केंद्र शासनाच्या संस्थेने संबंधित वेबसाईटवर बंदी घातली. एकतर ही वेबसाईट परदेशातून हाताळली जाते आणि आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही तक्रार निकाली काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.त्यामुळआता पुन्हा काम   करू  शकणार असून आता ती निर्दोष आहे असे सिद्ध होत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भेट .... कधीतरी . . . आपलीच आपल्याशी