Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नसीरने राजेशला वाईट अभिनेता म्हटल्यावर ट्विंकलने दिले हे उत्तर

नसीरने राजेशला वाईट अभिनेता म्हटल्यावर ट्विंकलने दिले हे उत्तर
एका मुलाखतीत राजेश खन्नाला वाईट कलाकार म्हणून नसीरुद्दीन शाहने वाद ओढवून घेतला आहे. नसीरने म्हटले की हिंदी सिनेमाचे स्तर पडले तेव्हा राजेश खन्नाचा उदय झाला आणि तो फार वाईट अभिनेता होता. 
 
त्याची सिनेमा निवडण्याची आवड, त्याचा स्टाइल इंडस्ट्रीवर हावी झाला होता. त्यामुळे कहाणी, अभिनय, संगीत सर्वांचे पतन झाले. सर्व काही रंगीन झाले होते. नायिकेला जांभळ्या ड्रेस तर नायकाला लाल शर्ट घालून काश्मीरला घेऊन जा आणि सिनेमा तयार. कहाणीची गरजच भासायची नाही.
नसीरने म्हटले की माझ्या हिशोबाने राजेश खन्नाला तेव्हा काही चांगले करायचे होते कारण तो तेव्हा दर्शकांसाठी देवस्वरूप होता.

यावर ट्विंकलने दिले करारे उत्तर...
webdunia
या टिप्पणीचा ट्विंकलला राग आला असून तिने ट्विट केले की सर, जर तुम्ही जिवंत व्यक्तीचा आदर करू शकत नाही तर निदान मेलेल्या व्यक्तीचा तरी आदर करूच शकता. आपण अश्या व्यक्तीबद्दल बोलत आहात जो 
प्रतिक्रिया देऊ शकतं नाही. आपला सन्मान करत हे सांगू इच्छित आहे की राजेश खन्ना ते व्यक्तिमत्त्व होतं ज्याने सिनेमाला प्रेम केलं आणि आनंद, अमर प्रेम आणि कटी पतंग सारखे चित्रपट दिले. लोकांनी त्यांना जे प्रेम दिले त्यासाठी धन्यवाद.

तिच्या या ट्विटला दिग्दर्शक करण जोहर, मराठी अभिनेता जितेंद्र जोशी ही साथ दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमच्या मेहनतीचं काय?