Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियंकाची रोजची कमाई दीड कोटी

प्रियंकाची रोजची कमाई दीड कोटी
बॉलिवूड गाजवून हॉलिवूडमध्येही ठसा उमटविणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या हातात सध्या कोणताही चित्रपट नसला तरी ती रिकामी आहे असे मात्र नाही. आजही ती कॅमेर्‍यासमोर आहे व रोज दीड कोटींची कमाईही करते आहे. आसाम सरकारने प्रियंकाला राज्याची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडले आहे. राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारने जाहिरात कँपेने सुरू केले आहे. 10 दिवसांच्या या जाहिरात शूटिंगसाठी प्रियंकाला 15 कोटी रूपये मानधन दिले गेले आहे म्हणजेच प्रियंकाची दिवसाची कमाई आहे दीड कोटी.

राज्यात सध्या पूरस्थिती आहे त्यामुळे सरकारकडे पैशांची थोडी चणचण आहे मात्र तरीही प्रियंकाला इतके मानधन दिले जात आहे कारण आसाम राज्याला पर्यटनातूनच सर्वाधिक महसूल मिळतो व त्यामुळे पर्यटनाबाबत कोणतीही तडजोड सरकारला मान्य नाही. 
 
प्रियंका अनेक कंपन्यांचीही ब्रँड अँबेसिडर आहे. तिचे जाहिरातींसाठीचे मानधन 1.3 ते 1.5 कोटी दरम्यान असतेच. पेप्सी, नेस्ले, नोकिया, कोलगेटसाठी प्रियंका काम करते आहे तसेच अतुल्य भारतसाठीही ती केंद्र सरकारची ब्रँड अँबेसिडर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेमासाठी करिअर सोडण्यास तयार कॅटरिना