Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनू निगमच्या मुलाचे खास गाणे (व्हिडिओ)

सोनू निगमच्या मुलाचे खास गाणे (व्हिडिओ)
, सोमवार, 1 ऑगस्ट 2016 (14:41 IST)
सोनू निगमने आजवर आपल्या बहारदार गाण्याने कायमच प्रेक्षकांना आनंद दिला आहे. सोनू निगमने 1982 पासून कामचोर या चित्रपटातून पार्श्वगायन केले.  
 
त्यानंतर बॉलिवूडसोबतच सोनूने तमिळ, तेलुगू, नेपाळी, तुल्लू, ओडिया आणि मराठीत देखील पार्श्वगायन केले. सोनूने नवरा माझा नवसाचा या चित्रपटात हिरवा निसर्ग हा भवतीने हे गाणे गायलं आणि प्रेक्षकांनी मराठीतदेखील सोनूचे आनंदाने स्वागत केले. 
 

सोनू प्रमाणेच त्याचा मुलगा निवान निगम देखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सोनूने अगदी 2 वर्षांचा असताना पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. त्याचप्रमाणे त्याने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या सरगम या अल्बमसाठी 2011 मध्ये पहिलं गाणे गायले तेव्हा निवानने कुठे शास्त्रशुद्ध अभ्यास करायला सुरुवात केली नव्हती. मात्र त्याल देवाचा आशीर्वाद असल्याचे सोनू स्वत: सांगतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका......