Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘ढिशूम’मध्ये अक्षयचा डॅशिंग लूक

‘ढिशूम’मध्ये अक्षयचा डॅशिंग लूक
आपल्या डॅशिंग लूकने पुन्हा एकदा प्रेक्षकांना बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आश्चर्याचा धक्का देणार असून अक्षयकुमार जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांच्या आगामी ‘ढिशूम’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा या चित्रपटातील फर्स्टलूक रिलीज झाला असून त्यात तो अतिशय कूल दिसत आहे. 
 
स्वत: अक्षयने जेट-स्कीवर स्वार आणि मोठे केस असा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. कॅमियो रोलचे शूटिंग. माझा मित्र साजिद, जॉन, वरुण, जॅकीला माझ्याकडून खूप शुभेच्छा, ढिशूम, असे या फोटोसह लिहिले आहे. सध्या चित्रपटाचे कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. निर्माता-दिग्दर्शकांना चित्रपटात नवे काहीतरी करायचे होते. म्हणूनच त्यांनी अक्षयला कॅमियो रोलमध्ये आणले. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे अक्षय आणि जॉन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. याशिवाय लवकरच अक्षयकुमारचा ‘रुस्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानसोबत रोमान्स करणार दीपिका!