Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘दबंग’साठी मी निष्ठावंत

‘दबंग’साठी मी निष्ठावंत
, शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (14:01 IST)
‘दबंग’ चित्रपटातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. तिची ‘दबंग गर्ल’ अशीही दुसरी ओळख आहे. असे असले तरी ‘दबंग 3’ या सिक्वेलमध्ये तिला स्थान नसल्याचे सांगितले जाते. 
 
याविषयी सोनाक्षीने आपले मत मांडले आहे. ‘दबंग’मुळे मी जे काही आहे. मला ‘दबंग’मुळे ओळख मिळाली आणि बॉलिवूडमध्ये पदार्पणही झाले. त्यामुळे दबंगसाठी मी निष्ठावंत आहे. त्यांनी मला पाहुणी कलाकार म्हणून बोलवले तरीही मी काम करेन, असे सोनाक्षी म्हणाली. 
 
तिसर्‍या सिक्वेलबद्दल ती म्हणाली, ‘दबंग’ची स्क्रिप्ट अद्याप तयार नाही पण रज्जो. (सोनाक्षीचे चित्रपटातील नाव ) त्यात असणार आहे. अचानकपणे ही व्यक्तिरेखा बदलली तर पुढे कसे जाता येईल. प्रामाणिकपणे सांगायचे तर ‘दबंग 3’ ची स्क्रिप्ट तयार नाही, त्यामुळे याबाबत कोणाशीही संपर्क झालेला नाही. 
 
त्यामुळे अंदाज बांधणे बंद करा. जेव्हा स्क्रिप्ट तयार होईल तेव्हा अरबाज घोषणा करेल, असेही सोनाक्षी म्हणाली. ‘दबंग 3’चे डिसेंबर 2017 मध्ये शूटिंग सुरु होईल असे सांगण्यात येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहिद, मीराच्या घरी आली नन्ही परी