Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘पद्मावती’त दीपिकासोबत हृतिक?

‘पद्मावती’त दीपिकासोबत हृतिक?
, शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (07:52 IST)
संजय लीला भन्साळी यांच्या महत्त्वाकांक्षी आणि दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटासाठी कलाकारांची जुळवाजुळव अजूनही सुरुच असून पद्मावतीला मिळवण्याची ईर्षा असलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहचे नाव जवळपास निश्चित झाले असतानाच, आता हृतिकचे नाव नव्याने समोर आले आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल्स’ने हृतिकसमोर भन्साळींनी चित्रपटाच्या स्क्रीप्टचे वाचन करुन खिल्जीचा रोल ऑफर केल्याचे वृत्त दिले आहे. रणवीरने भन्साळींकडे पक्की स्क्रीप्ट मागितल्यामुळेच त्याला डच्चू मिळाल्याची चर्चा आहे. हृतिकपूर्वी संजय यांनी शाहरुखकडेही धाव घेतली होती. मात्र किंग खान त्याचे 200 दिवस शूटिंगसाठी देऊ शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव हृतिकसमोर ठेवण्यात आला आहे.
 
या चित्रपटात दीपिका पदुकोण मेवाडची राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे, रणवीरला ही भूमिका मिळाली असती तर गलियोंकी रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसर्‍यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसली असती. राणी पद्मावतीचे पती म्हणजे राजा रावल रतन सिंगच्या व्यक्तिरेखेसाठी शोधाशोध सुरु आहे. दीपिका तिच्या पतीच्या भूमिकेसाठी मोठय़ा कलाकारासाठी आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. काही टीव्ही अभिनेत्यांशी राजाच्या भूमिकेसाठी चर्चा सुरु होती, मात्र दीपिकाने छोटय़ा कलाकारांना कास्ट करण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संसाराचा गोडवा