Publish Date: Tue, 01 Oct 2024 (10:47 IST)
Updated Date: Tue, 01 Oct 2024 (10:49 IST)
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहे. सदर घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. गोविंदा सकाळी कोलकात्याला जात असताना हा अपघात झाला. असे बोलले जात आहे की तो त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना हा अपघात झाला.
अभिनेत्याला क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभिनेता सध्या आयसीयूमध्ये असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे
गोविंदाच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता व शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला जाण्याची तयारी करत असताना परवाना असलेले रिव्हॉल्व्हर ठेवत असताना गोळी सुटून त्यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांच्या पायातील गोळी काढली आहे. त्यांची प्रकृती बरी आहे.सध्या ते रुग्णालयात आहे.
गोविंदा यांनी शोला और शबनम', 'राजा भैया', 'चलो इश्क लड़ाएं', 'जोरू का गुलाम', 'हीरो नंबर 1', 'बेटी नंबर 1', 'घर घर की कहानी' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत सुपरहिट चित्रपट दिले आहेत.