Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावरकर स्मारकाला अभिनेता रणदीप हुड्डा यांची भेट

सावरकर स्मारकाला अभिनेता रणदीप हुड्डा यांची भेट
, रविवार, 7 एप्रिल 2024 (10:34 IST)
देवळाली कॅम्प भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारकाला भेट देऊन पाहणी केली.
त्यावेळी बोलताना सिनेअभिनेता रणदीप हुड्डा यांनी सांगितले की येथे येऊन मी खूप भाऊक झालो आहे. ज्या क्रांतिकारची भूमिका साकारत आहे. तो हिंदी चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर आहे ज्या लोकांनी सावरकर यांचे घर सावरकर स्मारक होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार व्यक्त केले.
 
युनायटेड वि. फाउंडेशनचे  उपाध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी  सावरकर चित्रपटात भूमिका साकार करत असलेले अभिनेते रणदीप हुड्डा यांना भगूर येथील सावरकर स्मारक भेटीसाठी आमंत्रण करून  दुपारी २ वाजता भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिनेते रणदीप हुड्डांचे आगमन होताच ढोल- ताशा फटाक्याच्या आतिषबाजी करून भगूरकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
युनायटेड व्ही फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी हुडा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रणदीप हुड्डा यांचे उपास्थित महिलांनी औक्षण केले. सावरकर जन्मभूमी येथे स्मारकाला भेट दिल्यानंतर सावरकर स्मारकाचे सहाय्यक मनोज कुवर व भूषण कापसे यांनी हुड्डा यांना सावरकर जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन आणि  सावरकर स्मारकाची माहिती दिली.
 
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदचे पश्चिम महाराष्ट्राचे माजी प्रांत अध्यक्ष एकनाथराव शेटे तसेच यूनाइटेड वी फ़ाउंडेशन  नाशिक.अध्यक्ष - सागर मटाले , उपाध्यक्ष - अंकुश चव्हाण, पीयूष कर्नावट , नीरज चांडक , ओम काठे, हिमांशु सूर्यवंशी , गुरु सिंग , गिरीश गलांदे , कुशल लूथरा , अमित कस्तूरे, विकी शिंदे , रोशन महाले, अनिकेत गीते, रवि चव्हाणके, हरीश सिंग , अश्विनी कांबले, बंसारी पटेल , तेजल काले तसेच शरद कासार, प्रसाद आडके, सुमित चव्हाण, कैलास भोर, निलेश हासे, शाम देशमुख, शरद कासार ,अनाजी कापसे, प्रमोद शेटे,संभाजी देशमुख, मयूर शेटे,संदीप वालझाडे आदींसह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रवास करतांना सोबत घेऊन जा हे पदार्थ, होत नाहीत खराब