Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अय्यारी' सिनेमा इंटरनेटवर लीक

'अय्यारी' सिनेमा इंटरनेटवर लीक
, बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:51 IST)

नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. या प्रकरणात 'अय्यारी' सिनेमाची पायरेटेड कॉपी बनवत एका सरकारी बसमध्ये प्रवाशांना दाखवण्यात आला. अशा प्रकारे सिनेमाची पायरसी होत आहे.त्यानंतर  नाराज झालेल्या नीरज पांडे  यांनी सरकार आणि नागरिकांना "नो टू पायरसी" म्हटलं आहे. नीरज पांडे यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये नीरज पांडे यांनी म्हटलं आहे की, "इतकी जागरुकता असतानाही सरकारी बसेसमध्ये सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवण्यात येते. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो आणि स्पष्ट शब्दांत म्हणतो की, 'नो टू पायरसी'".

नीरज पांडे आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या सिनमाने जवळपास १२ कोटींची कमाई केली आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'नित खैर मंगा सोनिया मैं तेरी’ ची सोशल मीडियात चर्चा रंगली