rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजय देवगण आता फुटबॉलच्या मैदानात

Ajay Devgan is now on the football field
, शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (17:09 IST)
अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'मैदान'चा टीझर पोस्टर रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. केवळ चिखलामध्ये काही युवकांचे बरबटलेले पाय दिसत आहेत. हे युवक चिखलामध्ये फुटबॉल खेळत असल्याचे लगेचच ओळखायला येते. या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणी, गजराज राव आणि बोमन इराणीही असणार आहेत.
 
अमित रवींद्रनाथ शर्मांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. 27 नोव्हेंबर रोजी 'मैदान' रिलीज होणार आहे. प्रियामणिने यापूर्वी मनोज वाजपेयीबरोबर 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजमध्ये मनोजच्या पत्नीचा रोल केला होता. पण हिंदी चित्रपटात हे तिचे पदार्पण असेल. अजय देवगण हा अब्दुल रहिम नावाच्या फुटबॉल कोचचा रोल करत असणार आहे. सध्या अजचा 'तानाजी' फुल फॉर्मात सुरू आहे. त्याने कंगना राणावतच्या 'पंगा'ला धोबीपछाड दिली आहे. त्याच्या यशाचा आलेख अजूनही चढताच आहे.
 
कबड्डी, क्रिकेट, बॉक्सिंग, कुस्तीवर सिनेमा येऊन गेला आहे. आता केवळ फुटबॉल शिल्लक राहिला होता. त्यात अजने ही कसर भरून काढली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुबोध भावे साकारणार शरद पवार