बॉलीवूडचा लाडका स्टारकिड विचारल्यावर सर्वांच्या तोंडून एकच नाव निघेल ते तैमुर. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर कुठेही गेला की त्याची चर्चा असते. अनेकदा तो आई-वडीलांसोबत दिसला की त्या दोघांपेक्षा तैमूरवर कॅमेरा कोफस केलेला असतो हे कळून येतं.
तैमूर कोणते कपडे घालतो, काय खातो, काय खेळतो कसा वागतो या बद्दल सर्वांना जाणून घेण्याची आतुरता असते. त्यामुळे अलीकडेच सैफ अली खानला तैमूर बद्दल विचारल्यावर त्याने खुलासा केला की तो फार मनमानी करतो. त्याला शाळेत जायचं नसतं, त्याला एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटलं की तो चिडतो, मारेन, डोकं फोडेन असं म्हणतो. मात्र यात सर्वात करीनामुळे त्याला सूट मिळतेय असं वाटतंय. ती त्याला बिघडवतेय, त्याला धाक नाहीये.
काही असलं तरी तो गोड आहे आणि सध्या खूप लहान. लवकरच तैमूर आपल्या आई-वडील सैफ आणि करीनासोबत एका जाहिरातीत झळकणार असल्याची चर्चा आहे.