Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#HBD करिना कपूर खान, ३९ व्या वर्षात केले पदार्पण

webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (11:23 IST)
मुंबई – बॉलीवूडची बेबो प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर-खानचा आज वाढदिवस आहे. तिने आज 39 वर्षात पदार्पण केले आहे. तिच्या फॅशनसाठी आणि ड्रेसिंग स्टाईलसाठी ती ओळखली जाते. झीरो फिगरचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये तिनेच आणला. शुक्रवारी रात्री 12 च्या ठोक्याला करिनाने तिच्या कुटुंबियांसोबत तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. यावेळी तिचा पती अभिनेता सैफ अली खान आणि बहिण करिष्मा कपूर यांनी इनस्टाग्रामवर तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.
 
करिना कपूरने तिची करिअरची सुरूवात रेफ्युजी या चित्रपाटतून केली. हा तिचा डेब्यू सिनेमा होता मात्र तो फ्लॉप झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अभिषेक बच्चनने काम केले होते. रेफ्युजी सिनेमासाठी तिने फिल्मफेअरचा पुरस्कार मिळवला आहे. 2004 मध्ये चमेली या चित्रपटातून तिने सगळ्यांनाच तिच्या अभिनयाने स्तिमित केले. या भूमिकेची दखल फिल्मफेअरने घेतली आणि तिला स्पेशल परफॉर्मन्स हा अवॉर्ड देण्यात आला. 2006 मध्ये तिने ओमकारा चित्रपटासाठी उत्कृष्ठ अभिनेत्रीच 4 थ फिल्मफेअर अवॉर्ड पटकावल. त्यानंतर 2007 मधल्या तिच्या जब वी मेट या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या सिनेमासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर 2009 मध्ये थ्री इडियट्स साठी तिने पुन्हा एकदा उत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरल.
webdunia
गोलमाल रिटर्नस, रा-वन, हिरोईन, जब वी मेट, सिंघम रिटर्नस, एक मै और एक तू, 36 चायना टाऊन, सत्याग्रह, उडता पंजाब अशा असंख्य चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यानंतर एजंट विनोद, कुर्बान, सिंघम रिटर्नस, गोरी तेरे प्यार मै, बजरंगी भाईजान, या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर 2018 मध्ये तिने वीरे दी वेडिंगमधून बॉलीवूडमध्ये दणक्यात पुनरागमन केले.
 
करिना तिच्या फॅशन आणि डाइटच्या बाबतीत खूपच सजग आहे. तिची नृत्याची एक वेगळीच शैली आहे, ती आपण अनेक तिच्या गाण्यांमधून पाहिली आहे. तिने अनेक प्रकारच्या भूमिका आतापर्यंत साकारल्या आहेत. तिच्या आय़ुष्यातील अनेक घडामोडी ती सातत्याने मांडत असते. तिने आतापर्यंत तिच्या प्रेग्नंसीपासून ते अफेअर पर्यंत प्रत्येक गोष्ट मीडियासमोर मांडली आहे. अंग्रेजी मीडियम, गुड न्यूज हे तिचे आगामी सिनेमे आहेत. या चित्रपटांमध्ये तिच्या महत्तवपूर्ण भूमिका आहेत.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

मराठी सिनेसृष्टीने केले 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' वेबसिरीजचे कौतुक