Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्या बालन 'शकुंतला देवी'च्या भूमिकेत, टीझर प्रदर्शित

विद्या बालन 'शकुंतला देवी'च्या भूमिकेत, टीझर प्रदर्शित
, मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (10:17 IST)
अभिनेत्री विद्या बालन आगामी 'शकुंतला देवी' हा चित्रपट लवकरच घेवून येत आहे. या चित्रपटात विद्या बालन शकुंतला देवींची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. विद्या बालनने चित्रपटाचा टीझर स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या टिझरमध्ये शकुंतला देवींचा परिचय देण्यात आला आहे. हा चित्रपट २०२० ला रिलीज होणार आहे. तर सध्या या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, अनु यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले होते की, 'माझ्यावर शकुंतला देवींचा नेहमीच प्रभाव होता. माझा असा विश्वास आहे की, शकुंतला देवी ही एक एक्स्ट्रा-ऑर्डिनरी महिला होती. जी काळाच्या आधी आणि स्वतःच्या तत्त्वांवर अवलंबून होती.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमएक्स प्लेयर घेऊन येत आहे 'पांडू' आणि 'वन्स अ ईअर' #WeekendBingeOnMX