Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दृष्यम २ला तुफान प्रतिसाद मिळत असल्याने अजय देवगणने केली ही घोषणा

ajay devgan
, सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (15:15 IST)
बॉलीवूड स्टार अजय देवगण सध्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाच्या यशाने चर्चेत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने ६० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाची कमाई ज्या वेगाने सुरू आहे, ते पाहता हा चित्रपट लवकरच सुपरहिट होणार आहे, असे सांगितले जात आहे. दृश्यम २ च्या जबरदस्त कथेनंतर अजय देवगणने त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. अजय लवकरच आणखी एका साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक घेऊन थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अजय देवगण त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचा टीझर उद्या, मंगळवारी, २२ नोव्हेंबर रोजी शेअर केला जाणार आहे.
 
अजय देवगण आणि तब्बू यांनी ‘दृश्यम’ आणि त्याच्या सिक्वेलमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांचा हा ८ वा चित्रपट आहे. ८ चित्रपटांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवल्यानंतर हे दोन्ही प्रतिभावान कलाकार भोला या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु २०२३ च्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. ‘भोला’चे शूटिंग ऑगस्टमध्ये पूर्ण झाले. आता अभिनेत्याने चित्रपटाचा एक छोटा व्हिडिओ शेअर करून टीझरची घोषणा केली आहे. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार असून तो अजय देवगणने दिग्दर्शित केला आहे.
 
‘दृश्यम २’ ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित, चित्रपटाने थिएटरमध्ये प्रचंड प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.३८ कोटी, दुसऱ्या दिवशी २१.५९ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २७.१७ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ६४.१४ कोटी रुपये आहे. एका आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०० कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. ‘दृश्यम 2’ हा ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. तीन दिवसांत चित्रपटाने एकूण खर्चापेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याचबरोबर आगामी काळात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mangalgraha Mandir Amalner मंगळ ग्रह दोष निवारणासाठी जागृत देवस्थान