Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ब्रह्मास्त्र' बाबत उत्साहित

alia bhat
, शनिवार, 29 सप्टेंबर 2018 (00:01 IST)
आलिया भट्ट सध्या 'ब्रह्मास्त्र' या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतलेली आहे. या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे बरेचसे शूटिंग बल्गेरियात झाले. हा चित्रपट भारतीय चित्रपटांना पुढच्या स्तरावर नेईल, असे आलियाने म्हटले आहे. येथील 'ईस्ट ग्रीटस्‌ वेस्ट : एक कन्व्हर्सेशन थ्रू कॅलिग्राफी'च्या प्रीव्ह्यूमध्ये आलियाने  'ब्रह्मास्त्र'बाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, या चित्रपटाबाबत आम्ही सगळेच अतिशय उत्साहित आहोत. मला वाटते की हा चित्रपट भारतीय चित्रपटांना पुढच्या स्तरापर्यंत नेईल आणि पुढील वर्षी होणार्‍या त्याच्या प्रदर्शनाबाबत मी आतापासूनच उत्सुक आहे. हा चित्रपट ट्रायलॉजी आहे. आलियाच्या या चित्रपटात 'नागिन' फेम मौनी रॉय आणि दाक्षिणात्य स्टार नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. पुढील वर्षी 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंजुल भारद्वाज यांचे नाटक “राजगति” 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता “शिवाजी नाट्य मंदिर” मध्ये प्रस्तुत होणार!