Publish Date: Fri, 28 Sep 2018 (10:12 IST)
Updated Date: Fri, 28 Sep 2018 (08:13 IST)
चित्रपट सृष्टीत कधी कोण कोणावर काय आरोप करेल हे सांगता येणार नाही. असाच प्रकार अनेक वर्षांनी तनुश्री दत्ताने केला आहे. तिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानुसार अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकर यांनी खंडन करत इन्कार केला आहे. नाना यांनी ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वाहिनीशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया देत तनुश्रीविरोधात कायदेशीर पावलं उचलण्याचा इशाराही दिला. त्यांनी चित्रीकरणादरम्यान त्यावेळी सेटवर असणाऱ्या युनिटकडून यासाठी मदत घेणार आहे असे स्पष्ट केले. ‘लैंगिक शोषण... हे म्हणूच कसं शकतात आणि तर त्यावेळी माझ्यसोबत सेटवर ५०-१०० लोक उपस्थित होते. त्यामुळे आता कायद्याच्याची वाटेने काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष देणार असून, त्यावर वारंवार माध्यमांशी हा कथित प्रकारा विषयी बोलण्यात काही अर्थ नसल्याचंही नाना ने स्पष्ट केलं आहे .एकिकडे समाजोपयोगी उपक्रमांमध्ये जोरदार काम करत असलेल्या नानांवर झालेले हे आरोप बऱ्याच चर्चांना उधान आणले आहे. त्याचविषयीच आपली भूमिका मांडत कोणीही येईल, काहीही बोलून जाईल. पण, मी मात्र माझं काम करतच राहणार आहे. असे नाना स्पष्ट करतो. तनुश्री दत्ता या अभिनेत्री ने ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी सोबत असभ्य वर्त केल्याचा आरोप केला. असे होत होते तेव्हा माझ्या सोबत , पाठिशी कोणीच उभं राहिलं नाही म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही आरोप केले आहेत.