• जागतिक पातळीवरील प्रीमिअरसाठी शेरशाह हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडियो आणि धर्मा प्रोडक्शन्स यांच्यातील पहिला सहयोग
• धर्मा प्रोडक्शन्स आणि काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेल्या आणि विष्णू वर्धन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका; शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चंद्रजीत, साहिल वैद, शाताफ फिगार आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये
• १२ ऑगस्ट २०२१ पासून स्वातंत्र्य दिनाला जोडून येणाऱ्या वीकएंडपर्यंत शेरशाह हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडियोवर भारत आणि इतर २४० देशांमध्ये व प्रदेशांमध्ये स्ट्रीम होणार
मुंबई, १५ जुलै २०२१: अमेझॉन प्राईम व्हिडियोतर्फे अमेझॉन ओरिजिनल चित्रपट शेरशाह या चित्रपटाच्या जागतिक पातळीवरील प्रीमिअरची आज घोषणा करण्यात आली. या निमित्ताने जागतिक पातळीवरील प्रीमिअरसाठी प्रथमच अमेझॉन प्राईम व्हिडियो आणि धर्मा प्रोडक्शन्स एकत्र आले आहेत. कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत निर्मिती करण्यात आलेल्या या युद्धनाट्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला शेरशाह हा बॉलीवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असेल आणि स्वातंत्र्य दिनाच्या वीकएंडर्पर्यंत त्याचे प्रदर्शन होणार आहे. भारत आणि जगभरातील २४०+ देशांमधील आणि प्रदेशांमधील चाहत्यांना हा रोमांचक चित्रपट १२ ऑगस्ट पासून केवळ अमेझॉन प्राईम व्हिडियोवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे. आपले शेरशाह हे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते.
“या देशाच्या मातीत रुजलेल्या, फुललेल्या आणि जगभरातील प्रेक्षकांना आपल्या वाटणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना सांगण्यास अमेझॉन प्राइम व्हिडियोमध्ये आम्ही प्रयत्नशील असतो.”, असे अमेझॉन प्राईम व्हिडियो, इंडियाचे संचालक आणि कंटेन्ट विभागाचे प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले. “आम्ही या वर्षातील सर्वात प्रेरणादायी कथा असलेला शेरशाह हा चित्रपट प्रदर्शित करत असल्याचे अत्यंत अभिमानाने घोषित करत आहोत. हा चित्रपट आमच्यासाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात असणार आहे. या निमित्ताने आम्ही डायरेक्ट टू स्ट्रीम ग्लोबल प्रीमिअरसाठी धर्मा प्रोडक्शन्ससोबत हातमिळवणी करत आहोत आणि शेरशाह हा त्यासाठी अतिशय योग्य चित्रपट आहे. हा चित्रपट आमच्या प्रेक्षकांना प्रेरणा देणारा असेल आणि कारगील युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या शौर्याची आणि लष्कराच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा हा चित्रपट सांगेल.”
शेरशाह ही युद्धात शौर्य गाजविलेल्या युद्धनायकाची कथा आहे. त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आणि शौर्यामुळे आपल्या देशाने विजयश्री खेचून आणली. त्यांनी केलेले बलिदान अनमोल आहे आणि त्यांचा जीवनपट येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. या चित्रपटरूपी हिऱ्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या रूपाने आम्हाला खऱ्या अर्थाने एक कोंदण सापडल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि त्यांच्यासोबतच्या आमच्या नात्याच्या एका नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. शेरशाह ही आपल्या सैनिकांना दिलेली मानवंदना आहे आणि हा चित्रपट पाहून प्रत्येक प्रेक्षकाची छाती अभिमाने फुलून येईल, अशी मला आशा आहे.”, असे धर्मा प्रोडक्शन्सचे करण जोहर म्हणाले.
कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांची कथा सांगण्यासाठी बत्रा कुटुंबियांना सिद्धार्थ मल्होत्रा आणि आमच्याशी संपर्क साधला तेव्हाच शेरशाह हा एक खास चित्रपट असेल, याची आम्हाला खात्री होती.”, असे धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता म्हणाले. “ही कथा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला अमेझॉन प्राईम व्हिडियोसारखा उत्तम भागीदार लाभल्याचा आम्हाला आनंद आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा वीकएंड हे उत्तम औचित्य आहे. शेरशाह चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे आणि प्रेक्षकांचीही अशीच भावना असेल, अशी आम्हाला आशा आहे.”
गुलाबो सिताबो, शकुंतला देवी, छलांग, कूली नं. १, दुर्गामती, हॅलो चार्ली, शेरनी यांच्या यशस्वी प्रदर्शनानंतर आणि आगामी तूफान या चित्रपटानंतर अमेझॉन प्राईम व्हिडियोच्या वैविध्यपूर्ण चित्रपट संग्रहांमध्ये समाविष्ट होणारा शेरशाह हा ९ वा हिंदी भाषेतील बॉलिवूडचा डायरेक्ट-टू-सर्व्हिस चित्रपट आहे.