Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेझॉन प्राईम व्हिडिओची ऑरिजिनल सीरीज 'ब्रीद: इन द शैडोज़' 10 जुलै 2020 ला होणार प्रदर्शित!

अमेझॉन प्राईम व्हिडिओची ऑरिजिनल सीरीज 'ब्रीद: इन द शैडोज़' 10 जुलै 2020 ला होणार प्रदर्शित!
, शुक्रवार, 12 जून 2020 (16:18 IST)
अमेझॉन प्राईम व्हिडिओने आज घोषणा केली की अमेझॉन ऑरिजिनल सिरीज 'ब्रीद' चा बहुप्रतीक्षित नवीन सीजन 10 जुलै 2020 ला प्रदर्शित करण्यात येईल. साइकोलॉजिकल क्राइम थ्रिलर 'ब्रीद: इन द शैडोज़' अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे रचित आणि निर्मित असून या सीरीज द्वारे बॉलीवुड सुपरस्टार अभिषेक बच्चन आपला डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचसोबत, अभिनेता अमित साध पुन्हा एकदा आपली पुरस्कार विजेता भूमिका सीनियर इंस्पेक्टर कबीर सावंत साकारताना दिसणार आहे.
 
या मूळ सिरीजमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री निथ्या मेनन देखील आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. सैयामी खेर देखील एक प्रमुख व्यक्तिरेखेसोबत कलाकारांच्या या टोळीत सामील झाली आहे. ही बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजिनल सीरीज जगभरातील 200 हून अधिक देश आणि प्रदेशात विशेष करून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर लॉन्च होईल.
 
अमेझॉन प्राईम व्हिडिओतर्फे इंडिया ओरिजनल्सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या की, "अभिषेक बच्चन, अमित साध, निथ्या मेनन आणि सैयामी खेर यांच्यासहित अनेक महत्त्वाच्या कलाकारांसोबत आम्ही नवा शो ब्रीद: द शैडोज़ सादर करण्यासाठी अतिशय उत्साहित आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की संपूर्ण भारत आणि जगभरातील आमच्या दर्शकांना जखडून ठेवणारी ही इमोशनल थ्रिलर नक्कीच पसंत पडेल”
 
अबुदंतिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम मल्होत्रा म्हणाले की, "अबुदंतिया एंटरटेनमेंट नेहमीच विविधांगी शैलीत आकर्षक आणि प्रभावशाली कंटेंट बनवण्यात अग्रेसर राहिले आहेत. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत पुन्हा एकदा यशस्वी अमेझॉन ओरिजिनल सीरीज ब्रीद च्या नव्या सीजनसाठी सहयोग देण्यासाठी उत्साहित आहोत. मी व्यक्तिश: अमित, निथ्या आणि सैयामी यांच्यासोबत अभिषेक यांच्या येण्याने खूप आनंदित आहे आणि मयंक द्वारे एक मनोरंजक कहाणी, एक ताजी आणि उन्नत स्टोरी लाईन सोबत आम्हाला विश्वास आहे की हा शो संपूर्ण जगभरातील चाहत्यांना आवडेल."
 
निर्देशक मयंक शर्मा म्हणाले की, "आम्ही प्राईम मेंबर्ससाठी ब्रीदचा हा नवा सीजन आणताना आनंदित आहोत. जेव्हा की शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखेची आपली स्वत:ची अशी एक कहाणी आहे, परंतु या सर्व कहाण्या एकमेकांशी आंतरिक संबंधांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने   जोडल्या गेलेल्या आहेत. या नव्या चैप्टरसोबत प्राईम सदस्यांच्या भावना आणि रोमांच एका नव्या रोलर-कोस्टर राईडवर घेऊन जाण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत."
 
ही सीरीज अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आणि मयंक शर्मा द्वारा दिग्दर्शित करण्यात आली आहे. या शो ला भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिली आहे.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा शाहरुख खान म्हणाला, 'अबराम-आराध्या ही मोठ्या पडद्यावरची सर्वोत्कृष्ट जोडी होईल', अशी प्रतिक्रिया BIG Bची होती