'102 नॉट आऊट' चा ट्रेलर रिलीज
, बुधवार, 28 मार्च 2018 (16:58 IST)
अमिताभ बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा '102 नॉट आऊट' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अमिताभ बच्चन या सिनेमांत बापाची भूमिका करत असून ऋषी कपूर त्यांच्या मुलाची भूमिका साकारत आहे.
या सिनेमांत बिग बी 102 वर्षाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. तर ऋषी कपूर 75 वर्षाच्या मुलाची. या ट्रेलरमध्ये आहे की, जगातील हा पहिला वडिल असेल जो आपल्या 75 वर्षाच्या मुलाला वृद्धाश्रमात पाठवत आहेत. ओ माय गॉड सारख्या सिनेमांच दिग्दर्शन करणाऱ्या उमेश शुक्ला यांचा हा सिनेमा आहे.
पुढील लेख