Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nitin Desai:नितीन देसाईंची स्टुडिओमध्ये आत्महत्या

nitin desai
, बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (10:47 IST)
Twitter
Art director Nitin Desai found hanging in his studio बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या स्टुडिओत गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासात गुंतले आहेत. नितीन देसाई यांनी जोधा अकबर, देवदास आणि हम दिल दे चुके सनम सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले.
  
नितीन देसाई यांनी लगान, हम दिल दे चुके सनम, मिशन कश्मीर, देवदास, खाकी, स्वदेश यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केले. 2000 मध्ये हम दिल दे चुके सनम आणि 2003 मध्ये देवदाससाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. याशिवाय हरिश्चंद्र फॅक्टरी या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला.
 
 नितीन देसाई हे बॉलीवूडमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करायचे, त्याशिवाय ते मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रिय होते. नितीन देसाई मराठी चित्रपट दिग्दर्शनासोबतच चित्रपटांची निर्मितीही करत असत. इतकंच नाही तर त्याने काही चित्रपटांमध्ये स्वत: अभिनयही केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Veena Kapoor राजकुमारसोबत झळकणार वीणा कपूर