Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 29 March 2025
webdunia

मादाम तुसाँ म्युझियमध्ये 'कटप्पा' चा मेणाचा पुतळा

मादाम तुसाँ म्युझियमध्ये  'कटप्पा' चा  मेणाचा पुतळा

'बाहुबली' सिनेमातील 'कटप्पा'च्या व्यक्तिरेखा साकारलेले  तामीळ अभिनेते सत्यराज यांचा मेणाचा पुतळा लवकरच लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमध्ये दिसणार आहे. सत्यराज यांचा मेणाचा पुतळा 'कटप्पा'च्या अवतारातच तयार केला जाणार आहे. विशेष  म्हणजे सत्यराज हे पहिले तामीळ अभिनेते आहेत, ज्यांचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बसवण्यात येणार आहे. याआधी  मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये प्रभासचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला आहे. 

या बातमीनंतर सत्यराज यांचं कुटुंब अतिशय आनंदात आहे. त्यांच्या मुलाने या बातमीनंतर ट्विटरवर आनंद व्यक्त करत म्हटलं की, हे वाचून आम्हाला अभिमान वाटत आहे.  'सत्तम एन काईल' या सिनेमातून 1978 मध्ये सत्यराज यांनी कमल हासन यांच्यासोबत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी सुमारे 200 तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नघरी रंगणार शामक स्टाईल "बँड बाजा डान्स"