Bigg Boss 17 अंकिता लोखंडेने आपल्या पती विकी जैनसोबत रिअॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये एंट्री घेतली आहे. अशात सर्वांची नजर त्यांच्यावर आहे. दरम्यान अंकिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अंकिता खूप इमोशनल दिसत आणि ढसाढसा रडत आहे.
खरं म्हणजे जेव्हा अंकिता-विकीने शो मध्ये भाग घेण्याचे ठरवले तेव्हा दोघांना एकमेकांची साथ निभावण्याचे प्रॉमिस केले होते परंतु आता शो मध्ये अंकिता वेगळ्या तर विकी वेगळ्या दिशेला जाताना दिसत आहे.
विकी आणि अंकिता दोघांची कॅमेस्ट्री प्रीमियरच्या दिवशी खूप पसंत केली गेली मात्र बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर दोघांचा मूड काही वेगळाच दिसून येत आहे. विकी स्वभावाने मोकळा असल्याने त्याचं घरात सर्वांशी जुळून येत आहे तर अंकिता मोजक्या लोकांसोबत बोलते. अशात अंकिताला विकीचं सर्वांशी हसून-खेळून बोलणे काही फारसे पटत नाहीये. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.
अंकिताला वाटते की मैत्रीच्या भानात विकी अंकिताला हवा तितका वेळ देत नाहीये यामुळे अंकिता विकीवर चिडली आहे. अंकिताला एकटं असल्याची फिलिंग येत आहे. विकीशी बोलताना अंकिता म्हणते की घरात येताना तू म्हणाला होतास की आम्ही सोबत राहू मात्र तसे काही होत नाहीये. ती म्हणाली की मला जग हर्ट करु शकत नाही मात्र आपलं कुणी दुखी करत आहे. मला येथे एकटं जाणवत आहे. विकी तू सर्वींकडे आहे फक्त माझ्यासोबत नाहीये.
हे म्हणताना अंकिता ढसाढसा रडू लागते ज्यावर विकी तिला सॉरी म्हणतो. पण नाराज पत्नी पतीला क्षमा करण्याचा मूड मध्ये दिसत नाहीये. दोघांमधील ताण बघून चाहते हैराण होत आहे.