Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करणसोबत कॉफी शेअर करणार काजोल-अजय

करणसोबत कॉफी शेअर करणार काजोल-अजय
, मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (00:32 IST)
काही वर्षांतच चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. तो अनेक प्रसिद्ध कलाकारांना आपल्या शोमध्ये निमंत्रित करत असतो. येथे या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक गमतीजमती आणि कधीही न ऐकलेल्या घटना उघड होत असतात. 
 
काही दिवसांपूर्वीच या शोच्या 6 व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आता अजय आणि काजोलची जोडीदेखील एका भागात प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात होते. करणने स्वतः ट्विटवरून आता याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या काही काळापासून अजय देवगण आणि करण जोहर यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान काजोल आणि करणची घट्ट मैत्रीही कमी होताना दिसत होती. अजय आणि करणमधील वाद इतके वाढले होते, की हे दोघे एकेकांच्या सोर येणेही टाळत होते. पण नंतर दोन मुलांचा करण वडील झाला तेव्हा काजोलने पुढाकार घेत त्याचे अभिनंदन केले. आता यानंतर सर्व काही ठीक होत असून करणच्या शोमध्ये अजय आणि काजोल हजेरी लावणार असल्याचे करणने आणि काजोलनेही सोशल मीडियावर सांगितले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"कम्फर्ट झोन"